दुर्धर आजारावर मात करीत मिळविले डॉक्टरेट :प्रो.सौ. अश्विनी राजेश बलकी ह्यांच्या चिकाटीने समाजाला दाखविली दिशा - - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

दुर्धर आजारावर मात करीत मिळविले डॉक्टरेट :प्रो.सौ. अश्विनी राजेश बलकी ह्यांच्या चिकाटीने समाजाला दाखविली दिशा -

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : अभिनंदन बातमी -माणसाच्या मनात जिद्द आणि आपल्या ध्येयाबद्दलची एकनिष्ठता असली की कोणतेही संकट अगदी जिवन मृत्यूचा संघर्षही तुमची वाट अडवू शकत नाही.ह्यांचे मूर्तिमंत उदाहरण चंद्रपूरच्या सौ अश्विनी राजेश बलकी ह्यांनी समाजापुढे कायम केले आहे.


चंद्रपूरच्या शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालयात प्रोफेसर म्हणून कार्यरत सौ बलकी ह्यांनी 2012 मध्ये "भारतीय प्रसार माध्यमातील संवैधानिक आणि वैधानिक मापदंड" या अतिशय गुंतागुंतीच्या क्लिष्ट विषयावर शोध प्रबंध(पि.एच.डी.) करिता नोंदणी केली परंतु दरम्यानच्या काळात त्यांना किडनीच्या आजाराने ग्रासले.

त्यांच्या दोन्ही किडण्या निकामी झाल्यामुळे त्यांना जिवन मृत्यूच्या संघर्षाला तोड द्यावे लागले.अखेर त्यांच्या सासूबाई सौ सुनिता गोसाई बलकी यांनी आपली किडनी दान करून त्यांचे प्राण वाचले परंतु किडनी प्रत्यारोपणाच्या कठीण शस्त्रक्रियेतून जावे लागल्याने त्यांना अंथरुणाला खिळून राहावे लागले,शिवाय त्यांच्या शारीरिक हालचालींवर मर्यादा आल्याने त्यांच्या शोध प्रबंधाचा विषय मागे पडला परंतु आपल्या ध्येय गाठण्यावर कायम असलेल्या सौ बलकी ह्यांनी यांच्या शोध प्रबंधाच्या मार्गदर्शक व विधी महाविध्याल्याच्या प्राचार्य डॉ सौ अंजली हस्तक मॅडम यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाने कठीण परिश्रमातून आपला शोध प्रबंध विद्यापीठाला सादर केला,त्यांच्या परवानगीने यात मोलाचे सहकार्य संवेधनिक आणि वैधानिक मापदंड या शोध प्रबंधला 11 नव्हेंबर 2019 रोजी मान्यता देण्यात येवून सौ बलकी यांना डॉक्टरेट प्राप्त झाली आहेत.सौ बलकी यांनी जिद्दीने प्राप्त केलेल्या या यशाबद्दल त्यांचे मार्गदर्शक डॉ सौ अंजली हस्तक,राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार श्री अँड संजय धोटे,बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री सतीश धोटे,अँड यादवराव धोटे महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री सुधीर धोटे,श्री राजेश बलकी व महाविद्यालयातील त्यांच्या सहकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

सौ अश्विनी बलकी ह्या राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अँड संजय यादवराव धोटे यांच्या भाची असून त्यांच्या चिकाटी बद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.