चिमूर येतील पोलीस निरीक्षक यांची सर्वात मोठी कामगीरी : गुप्त माहितीच्या आधारे पकडलाय दारू साठा : - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चिमूर येतील पोलीस निरीक्षक यांची सर्वात मोठी कामगीरी : गुप्त माहितीच्या आधारे पकडलाय दारू साठा :

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : चिमूर- प्रतिनिधी ( जावेद पठाण )


चंद्रपुर जिल्यात सण २०१५ पासून दारू बंदी आहे आणि चिमूर शहरामध्ये होत असलेल्या अवैध दारुविक्रीवर नियंत्रण आणण्याकरिता पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे यांनी सर्व अधिकारी कर्मचारी यांना सूचना दिलेल्या असून सदर सूचनांचे अनुषंगाने आज दिनांक 22/12/19 रोजी रात्री 1/30 वाजता सुमारास चिमूर येथील पोलिस कर्मचारी पेट्रोलिंग करीत असताना उमा नदी जवळील स्मशानभूमीत दोन अनोळखी इसम एका स्कार्पिओ वाहनामधून दारू उतरवीत आहे अशी माहिती मिळाली.पोलिसांनी त्याठिकाणी छापा टाकला असता एकूण 20 बॉक्स मध्ये प्रत्येकी 48 नग याप्रमाणे एकूण 960 बॉटल्स किंमत 1,92,000 /- तसेच  एक स्कार्पिओ गाडी क्रमांक MH 33 A 3499 किंमत 8,00000 /- असा एकूण   9,92,000/- रुपये मुद्देमाल मिळून आला. 

हेही वाचा : 

आरोपी इसम हे घटनास्थळावरून पसार होण्यास यशस्वी झाले असून वाहन चालक व मालकविरुद्ध  गुन्हा नोंदवून चिमूर पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. सदरची कारवाही पोलीस निरीक्षक धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक रेजिवाड, पोलीस हवालदार विलास निमगडे, पोलीस शिपाई कैलास आलाम, विनायक सरकुंडे, प्रवीण गोन्नाडे, सैनिक गायकवाड, नेटिनकर, श्रीरामे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.