खबरकट्टा / चंद्रपूर :
समाजकल्याण मार्फत सुरू असलेल्या शासकीय मुलींच्या वसतिगृहाबाबत प्रशासन हे सतर्कता न बाळगता मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न स्वतः निर्माण करीत आहे असे चित्र दिसत आहे, असाच एक प्रश्न बल्लारपूर येथील वसतीगृहात निर्माण झाला असून मुलींच्या संरक्षणाकरीता जे सुरक्षा रक्षक आहे किंवा देखरेख करणाऱ्या महिला कर्मचारी आहे त्यांची संख्या केवळ चार असल्यामुळे एखादया रात्री मुलींची प्रकृती अचानक बिघडली आणि रूग्णालयात मुलींना दाखल करावयाचे झाल्यास वसतीगृहात बाकी मुलींच्या संरक्षणार्थ कुठलाच कर्मचारी उपस्थित राहू शकत नसल्याचे स्वतः तिथे राहणाऱ्या मुलींचे म्हणणे आहे.
मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न असतांना मुलींना पुरेशे जेवन सुध्दा नियमानुसार मिळत नाही आणि या वसतीगृहातील मुलींना ज्या शासकीय सुविधा दिल्या जायला हव्या त्या देण्यात येत नाही, मात्र या संदर्भात मुलींनी अधिकाऱ्याकडे तकार केली तर शेंडे नामक अधीक्षकांकडे याचा प्रभार असून त्या अधिक्षक मुलींना अश्लिल भाषेत शिवीगाळ करतात,
तक्रार केली तर वसतीगृहातून काढून टाकीन अशी धमकी सुध्दा ती महिला अधिक्षिका देत असते अशी वसतिगृहातील मुलींची तक्रार आहे.
या वसतीगृहातील महिला कर्मचारी विना वैरागडे व रजनी शेंडे स्वत:ची डयुटी करीत नसुन स्वयंपाक गृहातील कामे करून कंत्राटदारांना मदत करतात,त्यामुळे या वसतिगृहात जेवन पुरवठा करणारे कंत्राटदार आणि येथील कर्मचारी यांचे संगनमत आहे.
एवढेच नव्हे तर या वसतिगृहात ज्या
प्रभारी अथिक्षिका शेंडे आहे त्या कधीही आल्या तर एका पुरुष व्यक्तीला घेवून येतात, व तो व्यक्ती संदिग्धपणे हेल्मेट घालून वसतिगृहात येऊन थांबतो त्यामुळे
मुलींमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून पुन्हा राजुरा येथील प्रकरणाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यावरून हे वसतीगृह सर्व कर्मचारी अधिकान्यांना वैयक्तीक झाले असून इथे राहणाऱ्या मुलींनाच त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवल्या जात आहे.
त्यामुळे या गंभीर प्रकरणाची दखल घेवून महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या जिल्हाध्यक्षा सुनीता गायकवाड यांच्या नेत्रुत्वात नुकतेच सहाय्यक समाजकल्याण आयुक्त यांना निवेदन देवून हा प्रश्न येणाऱ्या दहा दिवसात सोडवल्या गेला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात येऊन समाजकल्याण अधिकाऱ्यांना घेराव करण्यात आला.
या प्रसंगी जिल्हाध्यक्षा सुनीता गायकवाड, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, जिल्हा सचिव किशोर माडगूळवार, जिल्हा सचिव अर्चनाताई आमटे , जिल्हा उपाध्यक्ष विमल लांडगे, शहर उपाध्यक्ष शकुंतला रंगारी, अर्चना वासनिक, विशाखा राजूरकर, माधुरी खोब्रागडे, भावना बैणर्जी, पार्वती शाहू. अमीत निमकर, आशिष नैताम, इत्यादींची उपस्थिती होती.