काँग्रेस नगरसेवकाला जीवे मारण्याची धमकी; आरोपी विरूध्द गुन्हा दाखल - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

काँग्रेस नगरसेवकाला जीवे मारण्याची धमकी; आरोपी विरूध्द गुन्हा दाखल

Share This

खबरकट्टा / चंद्रपूर :पोंभूर्णा -

नुकत्याच संपन्न झालेल्या विधानसभा निवडणुकीतील बल्लारपुर-मुल विधानसभेकरीता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे उमेदवार पोंभूर्णा शहरातील बसस्थानक चौकातील माजी तालुकाअध्यक्ष यांच्या कार्यालयात आले असता भेंट घेण्यास गेलेले काँग्रेस चे नगरसेवक जयपाल गेडाम यांना अमर रामटेके चंद्रपुर नामक इसमाने अश्लील शिवीगाळ करीत मारण्याची धमकी दिली. एवढेच नव्हे तर शाब्दिक चकमकीनंतर दुचाकीवरून हात धरून खाली पाडले अशा आशयाची फिर्याद नगरसेवकांनी पोंभूर्णा पोलिस स्टेशन ला दिली.
निवडणूकीत मतदान कमी का मिळाले या विषयावर सामान्य विचार विनीमय होत असतांना फिर्यादी नगरसेवकानी निवडणूकीत प्रभावी प्रचारयंत्रनेचा अभाव होता ,असे कारण विषद केल्याने उमेदवारासोबत असलेल्या अमर रामटेके यांनी सदर प्रकार केला. यावेळेस पराभूत उमेदवार व माजी तालुकाअध्यक्ष उपस्थित असतांना देखील बचावासाठी कोणीच पूढे आला नाही हे विशेष. सदर नगरसेवक पायांनी अपंग असतांनाही बाहेरील व्यक्तीने अशा पध्दतीने गुंड प्रवृत्ती दाखविण्याचे साहस करणे निषेधात्मक असल्याचे सांगून आदिवासीविंगचे प्रमुख अशोक शिडाम यांनी घटनेचा निषेध केला आहे. दरम्यान अमर रामटेके विरुद्ध पोंभूर्णा पोलिस स्टेशन मध्ये भादंवि २९४,५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.