बोगस शास.अधिकारी-कर्मचा-यांना सेवेतून बडतर्फ करा -गोंडवाना गणतंञ पार्टिची मागणी. - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

बोगस शास.अधिकारी-कर्मचा-यांना सेवेतून बडतर्फ करा -गोंडवाना गणतंञ पार्टिची मागणी.

Share This
खबरकट्टा /चंद्रपर-राजूरा 

आरक्षण ही भिक नसून, संविधानीक मार्गाने प्रतिनिधीत्व करण्याचा घटना व कायद्या नुसार मिळालेला अधिकार आहे. काही समाज घटक आपली खरी जात लपवून अनुसूचित जमाती मधिल "जाती" ची खोट्या व बनावट कागद पञा द्वारे चोरी करून व खोटे जातीचे दाखले काढून आरक्षणाचा लाभ घेत आहे.हे ख-या अनुसूचित जमाती मधिल बेरोजगार उमेदवारा वर अन्याय करणारा आहे. 

हा अन्याय आता खपवून घेतला जानार नसून संविधानीक मार्गाने व वेळ पडल्यास रस्त्यावर उतरून आमच्या हक्क-अधिकारा साठी लढा देण्याची तयारी गोंडवाना गणतंञ पार्टिचे जिल्हाध्यक्ष बापुराव मडावी यांनी निवेदना द्वारे शासन-प्रशासनाला इशारा दिला आहे. 
   

अनुसूचित जमाती प्रवर्गातून शास.सेवेत लागलेल्या वे जात वैध्यता प्रमाणपञ सादर करण्यास असमर्थ ठरलेल्या बोगस अधिकारी-कर्मचा-यांना सेवेतून बडतर्फ करण्याची न्यायीक लढाई अॅड. राजेंद्र मरसकोले यांचे नेतृत्वात आफ्रोट ही संघटना लढत आहे.या संघटनेने बोगसा विरूध्दचे अनेक न्यायालयीन लढाया जिंकल्या असतांनाही शासन-प्रशासन पाहीजे त्या प्रमाणात बोगसा विरूध्द कारवाई करीत नाही.


फक्त कार्यालयीन माहीती मागून वेळ काढू धोरण राबवीत आहे.प्रधान सचिव, सामान्य प्रशासन विभागाने 31 आक्टो.2019 च्या पञान्वये सर्व विभाग प्रमुखा कडून माहीती मागीतली. ग्राम विकास विभागाच्या सचिवांनी 2.11.2019 च्या पञान्वये सर्व जि.प. कडून माहीती मागीतली. चंद्रपूर जि.प. च्या प्राथ. शिक्षण विभागाने जात वैद्यता रद्द झालेल्या व सादर न करणा-या शिक्षक कर्मचा-यांची नावे/ माहीती दडविण्याचा प्रयत्न केला परंतू बापूराव मडावी यांनी हा प्रयत्न हानून पाडीत अशा आठ (8) बोगस शिक्षकाची नावे 2.11.2019 च्या पञान्वये जि.प.च्या मुख्य कार्य.अधिका-या कडे सादर केली. 

गोंडवाना गणतंञ पार्टिचे जिल्हाध्यक्ष बापुराव मडावी, जि.प.सदस्य गोदरू पाटील जुमनाके, याच्या नेतृत्वा खाली एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी चंद्रपुर मार्फतीने राज्याच्या सामान्य प्रशासन विभागचे प्रधान सचिवाला या सबंधातील निवेदन सादर केले. निवेदनात असेही नमुद केले की जात वैद्यता प्रमाणपञ मुदतीत सादर न करना-या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या पदाधिकारी व सदस्यांना अपाञ केले जात आहे ही समाधानाची बाब असली तरी हीच तत्परता या बोगस अधिकारी,कर्मचा-याच्या बाबतीत का? दाखवीत नाही. त्यांना पाठी शी घालून प्रशासन बोगसांना खत-पाणी घालत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. निवेदनाच्या प्रती मुख्य सचिव म.रा. सचिव,ग्राम विकास विभाग, विभागीय आयुक्त नागपूर, यांना दिल्या असून सदर बोगसांना सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी केली आहे.

शिष्टमंडळात जिवती पं.स.माजी सभापती भिमराव मेश्राम, गो.ग.पा.युवा जिल्हा अध्यक्ष गणपत नैताम, आदिवासी विध्यार्थी संघाचे जिल्हाध्यक्ष कंटू कोटनाके, पंकज सिडाम, संजय सोयाम, बंडू कुमरे, अरूण उदे, गंगूपाटील कुमरे, केशव कोटनाके सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.