प्राथमिक शाळांतून मिळणारे सर्वागीण संस्कार जीवनातील यशाची शिदोरी -- कर्नल दीपक डे - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

प्राथमिक शाळांतून मिळणारे सर्वागीण संस्कार जीवनातील यशाची शिदोरी -- कर्नल दीपक डे

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : कोरपना -

               

"प्राथमिक शाळा मानवी जीवनाचा पाया असून इथे मिळणाऱ्या संस्कारातून मानवी जीवन उन्नत बनून आदर्श व्यक्तिमत्व घडत असते म्हणून प्राथमिक शाळातील शिक्षण जीवनभराची शिदोरी आहे,असे प्रतिपादन अल्ट्राटेक सिमेंट कम्पनिचे उपमहा व्यवस्थापक कर्नल दीपक डे यांनी केले.


      
अल्ट्राटेक कम्युनिटी वेल्फेअर फाऊंडेशन आवरपूर आणि जिल्हा परिषद शाळा हिरापुर चे संयुक्त विद्यमाने हिरापुर येथे आयोजित बालोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी कर्नल दीपक डे यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख पंढरी मुसळे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच प्रमोद कोडापे,उपसरपंच शिवाजी बोढें, सचिन बोनडे,मारोती बतकी,सविता पाचभाई,स्वराज्य किसान ग्रुप चे अनिल लोडे, सतीश बोढें संदीप मोरे,उपस्थित होते सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमेस माल्यार्पण करून कार्यक्रमाँची सुरवात झाली याप्रसंगी मान्यवरांनी यथोचित मार्गदर्शन केले ,

         
यावेळी अनिस चे संतोष कुंदोजवार यांनी अंधश्रद्धा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावर प्रयोगासह मार्गदर्शन केले,नंतर विद्यार्थ्याचे गट तयार करून त्यांना मार्गदर्शक शिक्षकांनी टाकाऊ वस्तू पासून टिकाऊ वस्तू बनविणे,कागदी टोप्या बनविणे,ग्रीटिंग,मार्बल पेंटिंग,चेहरे रंगविणे हसत हसत खेळ खेळणे,असे विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना आनंदातून कृती करीत शिक्षण या बालोत्सव कार्यक्रमातून देण्यात आला या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून रत्नाकर भेंडे,संदीप कोंडेकर,संतोष कुंदोजवार,किशोर मून ऋषी मेश्राम,प्रवीण दुधबळे,रतन पचारे,राहुल दुबे यांनी मार्गदर्शन केले 
       
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अल्ट्राटेकचे  उपव्यवस्थापक संजय पेठकर यांनी केले संचालन शिक्षक सुनील अलोने यांनी केले तर आभारप्रदर्शन मुख्याध्यापक दशरथ धवने यांनी केले कार्यक्रमात सांगोडा,हिरापुर ,या शाळेतील विद्यार्थी शिक्षक ,पालक सहभागी झाले होते कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी अल्ट्राटेक चे ऐ के सिंग ,संदीप मोरे शिक्षक मेघराज उपरे,रमेश टेकाम स्वराज किसान ग्रुपचे सदस्य ,यांनी सहकार्य केले