चंद्रपूर जिल्ह्यासाठी २०० कोटीचे वनविद्या महाविद्यालय मंजूर - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूर जिल्ह्यासाठी २०० कोटीचे वनविद्या महाविद्यालय मंजूर

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : थोडक्यात :

डॉ पंजाबराव देशमुख कृषिविद्यापिठ अकोला अंतर्गत सिंदेवाही येथे विभागीय संशोधन केंद्र आहे. याकेंद्रामध्ये शासकीय वनविद्या महाविद्यालय मंजूर करावे अशी मागणी आ.विजय वडेट्टीवार यांनीनागपूरच्या हिवाळी अधीवेशनात करून सरकारचे लक्ष वेधले होते.
त्यांच्या मागणीची दखल घेत विदर्भाच्या पॅकेजमध्ये याचा समावेश करून सिंदेवाही येथे वनविद्या महाविद्यालय मंजूर करीत असल्याची घोषणा मुख्यंमत्री उध्दव ठाकरे यांनी जाहीर केली. या निर्णयामुळे चंद्रपूर,गडचिरोली जिल्हयासह पुर्व विदर्भातील युवकांना, विद्याथ्र्यांना मोठया प्रमाणात फायदा होणार आहे.

चंद्रपूर जिल्हयामध्ये ३५.०८टक्के जंगल आहे. वनउपजांचा योग्य पध्दतीने वापर करण्यासाठी कृषी आधारीत वनशेतीकडे वळावे लागणार आहे.