जिल्हाधिकारी कार्यालयावर पटवारी संघटना धडकणार : एक दिवशीय धरणे आंदोलन - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जिल्हाधिकारी कार्यालयावर पटवारी संघटना धडकणार : एक दिवशीय धरणे आंदोलन

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

जिल्हाधिकारी कार्यालयावर दि. १६ डिसेंबर२०१९ रोजी दु.१२ वाजता पटवारी संघटनेचा मोर्चा धडकणार आहे. तसेच पटवारी संघटनेचा भव्यमोर्चा व धरणे आंदोलन पटवारी संघटनेचे सभासद पटवारी. मंडळअधिकारी यांच्या शासनमान्य आर्थिकव सेवा विषयक प्रलंबीत मागण्या निकाली काढण्याबाबत जिल्हाधिकारी यांना दि. १२ जुलै२०१९ रोजी निवेदन दिले. 

त्यानिवेदनातील प्रमुख मागण्या शासन निर्णयाप्रमाणे एक महिन्यात कार्यवाही करणार असल्याबाबत आश्वासन संघटनेला देण्यात आले होते. 


परंतु अजुनही आमच्या शासनमान्य आर्थिक व सेवा विषयक मागण्या जिल्हा प्रशासनाकडून निकाली निघाल्या नसल्याने जिल्हातील पटवारी संघटनेचे सभासद सर्व पटवारी व एकूण १८ मंडळ अधिकारी दि.०९ डिसेंबर २०१९ पासून साप्ताहिक रजा व कामबंद आंदोलन सुरु केले असुन या आंदोलनाची जिल्हा प्रशासनाने कोणतीही दखल घेतलेली नाही. 

त्यामुळे प्रशासनाने मागण्यांचे पुर्ततेसाठी लक्ष वेधण्याकरीता पटवारी भवन चंद्रपूर ते जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपुर पर्यंत मोर्चा काढणार असून त्याच दिवशी जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपुर समोरदुपारी १२.०० ते ५.०० वाजेपर्यंत एक दिवसीय धरणे आंदोलन करणार आहेत.