झरीजामनी तालुक्यातील भ्रष्ट रेशन दुकानदार करीत आहे सामान्य गोरगरीब जनतेची सऱ्हास लूट - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

झरीजामनी तालुक्यातील भ्रष्ट रेशन दुकानदार करीत आहे सामान्य गोरगरीब जनतेची सऱ्हास लूट

Share This
खबरकट्टा /यवतमाळ :झरी जामणी प्रतिनिधी -गणेश पेटकर 

महाराष्ट्रतील अतिदुर्गम  भाग म्हणून यवतमाळ जिल्ह्यातील झरी जामनी तालुका हा प्रसिद्ध आहे.या परिसरामध्ये सुशिक्षितांचा वर्ग कमी आदिवासी बहुल असल्यामुळे याचाच फायदा घेत "काही भ्रष्ट रेशन दुकानदार" सामान्य जनतेला सऱ्हास लुटत आहे.


तालुक्यातील मुकुटबन,अडेगाव ,खडकी व मोठ्या व लहान संपूर्ण गावामध्ये स्वस्त धान्याचे दुकाने शासनाने सामान्य जनतेच्या हितासाठी उपलब्ध करून दिले आहे,जवळपास तालुक्यातील संपूर्ण गावामध्ये रेशन दुकाने शासनाने उपलब्ध करून दिले आहे,यातील काही भ्रष्ट रेशन दुकानदार सामान्य जनतेला "जादा दराणे" धान्य देऊन त्यांची फसवणूक करून जनतेला लुटण्याचे काम करीत आहे.

काही भ्रष्ट रेशन दुकानदार जनतेला धान्य दिल्यावर त्यांना शासनमान्य पावती (स्लिप) देत नाही,त्यांना लिंक नसल्याचे करण देऊन पावतीसाठी टाळाटाळ करीत असतात.

तर काही भ्रष्ट रेशन दुकानदार नवीन रेशन पुस्तक बनवून देण्यासाठी पुस्तकावरील नाव कमी व चढवण्यासाठी लाभार्थीकडुन सऱ्हास पैशाची मागणी करून सामान्य गोरगरीब जनतेची लूट करीत आहे.

परिसरातील काही भ्रष्ट रेशन दुकानदार उर्वरित धान्याचे पोतेच्या - पोते विकताना सुद्धा विकण्याची परिसरामधील जनतेत चर्चा होत आहे.

शासनाने धान्य दुकानामधील धान्याचे दर गहू- 2 रु,तांदूळ - 3 रु, तुळडाळ - 35 रु असे ठरवले आहे.तरी भ्रष्ट रेशन दुकानदार सामान्य गोरगिरब जनतेकडून जादा दराने धान्य विकून त्याची आर्थिक लूट करीत आहे.
मात्र त्या सर्व बाबीवर प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे आणि सामान्य गोरगरीब जनतेला भ्रष्ट रेशन दुकानदार सऱ्हासपणे समाजातील जनतेला लुटताना दिसत आहे.

प्रशासन या मुख्य बाबीकडे कोणत्या नजरेमधून बघून काही  भ्रष्ट रेशन दुकानदाराचे परवाने रद्द करते व त्यांच्यावर कायदेशीर कारवाही करते याकडे परिसरातील सामान्य जनतेच्या लक्ष वेधले आहे.