जेव्हा त्याच्याच रक्ताने वाचविले त्याचेच प्राण : रक्तदानातील दुर्मिळ योगायोग - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जेव्हा त्याच्याच रक्ताने वाचविले त्याचेच प्राण : रक्तदानातील दुर्मिळ योगायोग

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 

रक्तदान हे महादान, आपातकाल परिस्थितीत अनेकांचे जीव वाचविण्यासाठी रक्तदानाच्या चळवळीचा व दात्यांच्या सहभाग समाजातील सर्वोत्तम प्रयोग असून कठीण प्रसंगी अचानक एखाद्या अनोळखी व्यक्तीने रक्तदान करून गरजू रुग्णाला नवसंजीवनी द्यावी याचा अनुभव अनेक रुग्ण व नातेवाईकानां दिलासादायक असतो. परंतु जर आपणच केलेले रक्तदान आपलेच प्राण वाचविण्यास उपयोगात येणे असा दुर्मिळ योगायोग काल चंद्रपूर शहरातील पोदार हॉस्पिटल येथे उपचार घेत असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांस आला.
रुग्णाच्या नातेवाईकांनी टीम खबरकट्टा ला दिलेल्या माहिती नुसार काल दिनांक  20/12/2019 ला आधीच्या रात्री राजुरा तालुक्यातील गडचांदूर मार्गावरील हरदोना गावाजवळ मध्यरात्री  12:30 च्या च्या आसपास गणेश नत्थूजी ढवस  , राहणार भोयेगाव याच्या दुचाकीला दुसऱ्या भरधाव दुचाकीने ठोस दिल्याने गणेश याला गंभीर दुखापत होऊन पाय फ्रॅक्चर झाल्याने तात्काळ चंद्रपूर येथील पोद्दार हॉस्पिटल ला दाखल करण्यात आले.गंभीर अपघात झालेल्या गणेश ला रक्ताची आवश्यकता असल्याने त्याचा दुर्मिळ रक्तगट ओ नेगेटिव्ह (prc) शहरातील नामांकित ब्लड बँकेकडे मागणी केली असता, रक्तगट दुर्मिळ असल्याने उपलब्धता नव्हती, त्यानंतर शहरातील अनेक रक्तदुतांनी दात्यांसोबत संपर्क साधतं असतानाच ओ नेगेटिव्ह या दुर्मिळ रक्तगटाचे रक्तदान गणेश ढवस या दात्याने  6 डिसेंबर ला जिल्हा सामान्य रुग्णालयात केले असल्याचे समोर आले.

नातेवाईकांनी तिकडे धाव घेतली असता तो रक्तदाता दुसरा तिसरा कुणीही नसून स्वतः गणेश ढवस असल्याची उपलब्ध रक्ताच्या बॅग वर नोंद होती. त्यानंतर रक्त नमुने क्रॉस मॅच करून गणेश ला पुनः त्याचेच रक्त चढविण्यात आले.
गणेश नेच दुर्मिळ गटाच्या दान केलेल्या रक्ताने आज त्याचे  स्वतःच जीवन वाचत आहे  नातेवाईकाना समजल्यावर त्यांच्या डोळ्यात कौतुक आणि आनंदाचे पुसट अश्रू तरळले होते.रक्तदान श्रेष्ठदान !