भांगडिया भाजपा सोडण्याच्या तयारीत ? : अजित पवारांच्या गुप्त भेटीने राजकीय चर्चांना उधाण - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

भांगडिया भाजपा सोडण्याच्या तयारीत ? : अजित पवारांच्या गुप्त भेटीने राजकीय चर्चांना उधाण

Share This
खबरकट्टा / राजकीय चर्चा :
गोसीखुर्द आणि सिंचन घोटाळ्यातील प्रकरणात क्लीनचिट मिळाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार सिंचनशी संबंधित असलेल्या लोकप्रतिनिधींना जवळ करण्याचा प्रयत्न करीत आहेत याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादीचा पक्ष विस्तार करण्याचा प्रयत्न सुरू आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील या  आमदाराच्या निवासस्थानी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सदिच्छा भेट घेतली होती. ही भेट जुन्या मैत्रीच्या खातर असली तरी भाजपची सत्ता हातून गेल्याने काही नेते राष्ट्रवादीचे चाहते झाले आहेत.

भाजपची सत्ता येणार म्हणून या चंद्रपूरच्या आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा दिला होता. त्यावेळी हे सिंचनाशी संबंधित भाजपा आमदार पाठीशी होते. मात्र दिवस बदलले आणि शिवसेनेची सत्ता आली. शपथविधी होत नाही तोच आपला पाठिंबा सत्ताधारी पक्षाला दिला. बदललेल्या कोणाला ओढीने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रबळ होऊ पाहत आहे. 

हेही वाचा : महाराष्ट्रातील भाजपचे 15 आमदार पक्ष सोडण्याची शक्यता ? 

मुख्यमंत्री शिवसेनेचा असला तरीही राष्ट्रवादीचे वजन जास्त राहणार आहे. त्याचे कारणही तसेच आहे. ते म्हणजे शरद पवार. पुढील पाच वर्षे तरी हे त्रिशंकू सरकार राज्यात कायम राहील अशी शक्यता असल्याने आपले कामे होतील की नाही या भीतीने अनेक आमदार भाजप सोडून राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता निर्माण झालीय.याची जबाबदारी अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या खांद्यावर देण्यात आल्याची माहिती आहे. म्हणूनच अजित पवार हे भाजपच्या आमदारांच्या संपर्कात आहेत. अधिवेशनादरम्यान नागपुरात असलेल्या सर्व आमदारांच्या गर्दीत 19 डिसेंबर ला धंतोली स्थित या चंद्रपूर जिल्ह्यातील आमदाराच्या घरी अजित पवार भेटीसाठी गेले होते. यावेळी अनेक गोष्टींवर चर्चा झाली असल्याची  त्यांच्या घनिष्ठ वर्तुळात चर्चा आहे.  विदर्भातील जवळपास बारा भाजपचे आमदार राष्ट्रवादी जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हेही वाचा : कर्जमाफीसाठी एकच अट ! : नव्या कर्जमाफीसाठी कोण पात्र?

चिमूर पंचायत समिती मध्ये दलालांचा सुळसुराट : अधिकाऱ्याची दलाला सोबत मिलीभगत.