जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीच्या जेवणात सापडल्या ऊंदीरच्या लेंड्या व अळ्या : जिल्हा परिषद जुबली हायस्कूल चंद्रपूर येथील प्रकार ! - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीच्या जेवणात सापडल्या ऊंदीरच्या लेंड्या व अळ्या : जिल्हा परिषद जुबली हायस्कूल चंद्रपूर येथील प्रकार !

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :शहर प्रतिनिधी -


चंद्रपूरच्या जिल्हा परिषद जुबली शाळेतील भरलेल्या       विज्ञान प्रदर्शनी मधे पहिल्याच दिवशी म्हणजे 23 डिसेंबर ला सकाळच्या नासत्यांमध्ये एका शिक्षकाला लेंड्या सापडल्या असल्याने खळबळ माजली असताना दुसऱ्या दिवशी म्हणजे 24 डिसेंबरला सकाळी उपमा होता.

हेही वाचा : ब्रेकिंग न्यूज : शाळेत पुरवठा केल्या जाणार्‍या तांदूळामध्ये अळ्या / Lakes in rice supplied at school

त्यामध्ये सिंदेवाही च्या दिव्यांनी इंटरनॅशनल स्कूल च्या विद्यार्थ्याच्या प्लेटमध्ये अळ्या सापटल्याचा धक्कादायक प्रकार सामोरं आला होता. खरं तर या प्रकाराची गंभीर दखल घेवून विज्ञान प्रदर्शनी आयोजकांनी त्यामधे सुधार करणे आवश्यक होते, परंतु तिसऱ्या दिवशी म्हणजे 25 डिसेंबरला  सकाळी उपमा यामध्ये सुद्धा अळ्या सापडल्या त्यामुळे आता या विज्ञान प्रदर्शनीला गालबोट लागले असून जेवणाचे टेंडर ज्यांच्याकडे आहे त्यांनी निकृष्ट प्रकारचे जेवन देवून भ्रष्टाचार केल्याचे सामोरं आले आहे. 
या प्रदर्शनी मधे विद्यार्थी व शिक्षक यांना निकृष्ट दर्जाचे जेवन देणाऱ्या कंत्राटदार यांच्या विरोधात प्रशासन करवाई करणार का ? हा प्रश्न चर्चिला जात असला तरी यामधे संबंधित अधिकारी यांचा सुद्धा यामधे सहभाग असल्याने याची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी तक्रार शिक्षकांनी केली आहे.