चिमूर पंचायत समिती मध्ये दलालांचा सुळसुराट : अधिकाऱ्याची दलाला सोबत मिलीभगत - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चिमूर पंचायत समिती मध्ये दलालांचा सुळसुराट : अधिकाऱ्याची दलाला सोबत मिलीभगत

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :चिमूर- प्रतिनिधी (जावेद पठाण )चिमूर तालुक्यातील खेड्यापाड्यातील लोक हे आपले प्रशासकीय काम करण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी येत असतात. पण तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या पंचायत समिती या कार्यालयामध्ये  अनेक दिवसांपासून दलाल राहतात व ते सामान्य माणसाकडून पैसाची लूट करीत असतात. अशी चर्चा परिसरात होत आहेत.

       
ग्रामीण भागात राहत असलेले निरक्षर लोक हे आपल्या प्रशासनाच्या कामाला आठवड्यातून दोन चार दा तरी पंचायत समिती ला यावे लागत असते, याचाच फायदा दलाल लोक जास्तच प्रमानात घेत आहेत. 

निरक्षर लोक अनेक योजनांचे फार्म देण्यासाठी येत असतात, तेव्हा हे दलाल लोक मी तुमचे काम करून देतो असे म्हणून त्यांच्या कडून पैसाची माग करत असतात. व त्या निरक्षर लोकांनी पैसे दिले नाही, तर त्यांना अनेक प्रकारच्या धमक्या देऊन "तुम्ही आमच्या हाताने काम केले नाही तर..तुमचे काम होणारच नाही " असे संबोधतात व त्यांना कामात अडथळा निर्माण करतात. या पद्धतीने दलाल लोक निरक्षर लोकांना आपल्या जाळ्यात फसवतात. हे मागील अनेक दिवसांपासून चालू आहे तर याकडे वरिष्ठ अधिकारी लक्ष केंद्रित करतील का..??