खबरकट्टा / चंद्रपूर :पोंभुर्णा -
पोंभुर्णा तालुक्यातील जामतुकुम येथील सचिन वाढई (२५) यांनी अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंधातून पळवून चंद्रपूर गाठले. आपल्या मावशीकडे मुलीला थातुरमातुर कारण सांगत नेऊन ठेवले.मावशीने आरोपीच्या माघारी मुलीची चौकशी केली असता मुलीने आपली आपबिती सांगितली.
मावशीनी माणुसकी दाखवत सरळ सी.टी पोलीस स्टेशन चंद्रपूर मध्ये दोघांनाही नेले असता तक्रार दाखल करत. पुढील तपास पोक्सो विशेष पथक मूल यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात आरोपीवर ३६३, ३७६ पोक्सो (४/६) अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली असून, पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक वनमाला पारधी, पोलीस कॉनस्टेबल विनोद वाघमारे, कविता निखाडे करीत आहेत.