त्या नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी याकरीता प्रशांत डवले, उपाध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार व सामाजिक न्याय संस्था यांनी तहसीलदारांना निवेदन दिले.
चिमूर - प्रतिनिधी ( जावेद पठाण )
चिमूर : - चिमूर तालुका येथील राष्ट्रीय मानवाधिकार आणि सामाजिक न्याय संस्था यांचे माध्यमातून हैद्राबाद येथे झालेल्या पशु वैधकीय डॉ.प्रियंका रेड्डी यांच्यावर ४ नराधमांनी बलात्कार करून तिला जाळून मारले या अमानुष कृत्यांनी मानव जातीला शरम येईल असे वाईट काम करणाऱ्यांना कठोर अशी शिक्षा देऊन फाशीची शिक्षा द्यावी असे निवेदन राष्ट्रीय मानवाधिकार आणि सामाजिक न्याय संस्था शाखा चिमूर यांचे कडून तहसिलदार नागतिळक साहेब तहसिल कार्यालय चिमूर मार्फत माननीय राष्ट्रपती साहेब व भारत सरकार यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी निवेदन देतांना सचिन गेडाम ता.अध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार आणि सामाजिक न्याय संस्था चिमूर , प्रशांत डवले ता.उपाध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार आणि सामाजिक न्याय संस्था चिमूर, रुपेश जांभूळकर ता.सचिव राष्ट्रीय मानवाधिकार आणि सामाजिक न्याय संस्था चिमूर,अब्दुल रहेमान शेख ता.सहसचिव राष्ट्रीय मानवाधिकार आणि सामाजिक न्याय संस्था चिमूर, हितेश सीडाम ता.सहसचिव राष्ट्रीय मानवाधिकार आणि सामाजिक न्याय संस्था चिमूर, प्रेमदास वासनिक ता.संघटक राष्ट्रीय मानवाधिकार आणि सामाजिक न्याय संस्था चिमूर, गणेश संघेल, ग्रामीण संघटक राष्ट्रीय मानवाधिकार आणि सामाजिक न्याय संस्था चिमूर, अमित मेश्राम ता.सल्लागार राष्ट्रीय मानवाधिकार आणि सामाजिक न्याय संस्था चिमूर, सौ.लीना उरकुडे, सौ.यशोदा गायकवाड, सौ.हेमलता जांभुळकर, सौ.वंदना गेडाम, सौ.रोहिणी गौरकार व ईतर सर्व सदस्य निवेदन देतांना हजर होते.
निवेदन दिल्यानंतर कोणत्याही सर्वसामान्य जनतेवर अन्याय किव्हा अत्याचार झाल्यास व त्याचे मानवी हक्क हिरावून घेतल्यास आपण आमच्या संस्थेमार्फत आपल्याला आपला हक्क मिळवून देण्यासाठी ही संघटना नेहमी कार्यरत असेल व जनतेच्या सेवेसाठी निस्वार्थी सेवा करेल असे मत यावेळी प्रशांत डवले, उपाध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार आणि सामाजिक न्याय संस्था तसेच युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष चिमूर यांनी व्यक्त केले.