खबरकट्टा / चंद्रपूर - जिवती - संतोष इंद्राळे
आधुनिक काळातील मानवाचे धकाधकीचे आणि धावपळीचे जीवन बघता मानवाला योगाची नितांत आवश्यकता आहे. जेणेकरून मानवाला निरोगी आयुष्य आनंदने जगता येईल. हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन आणि जीवती तालुक्यातील महिलांचे सकाळ ते संध्याकाळ असा व्यस्त दैनंदिन कामकाज पाहता, येथील महिलांच्या जीवनात योगासना ची गरज लक्षात घेता, विदर्भ महाविद्यालय जीवती च्या शारीरिक शिक्षण विभागातर्फे योगा केंद्र स्थापन झाले आहे.
य़ा अंतर्गत दैनिक योग कार्यक्रम दिनांक 20/12/2019 पासून रोज सकाळी 5 वाजून 30 मिनिटानी सुरु होत आहे. तरी जीवती तालुक्यातील इच्छुक महिलांनी महाविद्यालय़ाच्या योग केंद्रात आपल्या नावाची नोंदणी करावी आणि आपल्या शरीराला सुदृढ व निरोगी ठेवण्याच्या अशा उपक्रमात सहभागी होण्याच्या संधीचा लाभ घ्यावा.
धक्कादायक विडिओ : चंद्रपूरकर खात आहेत विषारी सांडपाण्यात धुतलेला भाजीपाला !!रसायनयुक्त भाजीपाल्याच्या सेवनाने मेंदूचे आजार -ब्रेन स्ट्रोक, लकव्याला निमंत्रण