मद्यधुंद"ड्युटी"-तळीराम शिक्षक शाळा वेळात शेताच्या बांधावर करतो "ड्युटी"! -बघा विडिओ -मद्यधुंद अवस्थेत झोपा काढत घालवितो दिवस - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

मद्यधुंद"ड्युटी"-तळीराम शिक्षक शाळा वेळात शेताच्या बांधावर करतो "ड्युटी"! -बघा विडिओ -मद्यधुंद अवस्थेत झोपा काढत घालवितो दिवस

Share This
दारूच्या अतिसेवनामुळे मद्यपी शिक्षकाने शाळेच्या वेळात शाळेलगत असलेल्या शेतीच्या बांधावर चक्क झोपून 'ड्युटी' केली.शिक्षकी पेशाला काळिमा फासणारा हा प्रकार गोंडपिपरी तालुक्यातील भंगारपेठ या गावात गुरुवारी  घडून आला.
खबरकट्टा /चंद्रपूर :गोंडपिपरी : 

दारूच्या अतिसेवनामुळे मद्यपी शिक्षकाने शाळेच्या वेळात शाळेलगत असलेल्या शेतीच्या बांधावर चक्क झोपून 'ड्युटी' केली.या घटनेची माहिती गावभर वाऱ्यासारखी पसरताच गावकरी आणि पोलिसांच्या सहकार्याने 'त्या' मद्यपी शिक्षकाला गाड झोपेतून उठवण्यात आले.मात्र त्या दरम्यान आपले गुरुजी झोपेतून कधी उठतील आणि आम्हचा कधी वर्ग घेतील या आशेने विद्यार्थी 'त्या' तळीराम शिक्षकांच्या उठण्याची वाट बघत राहिले.


पंचायत समिती गोंडपिपरी अंतर्गत भंगारपेठ गावात ही प्राथमिक शाळा आहे.तेलंगणा राज्यालगत असलेल्या या परिसरात दारूचे प्रमाण मुबलक आहे.हाकेच्या अंतरावर असलेल्या तेलंगणातून या परिसरात दारूची आयात केली जाते.गटग्रामपंचायत भंगाराम तळोधी अंतर्गत येणाऱ्या भंगारपेठ गावात २ शिक्षक कार्यरत असून शाळेत एकूण २७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.अश्यातच गुरुवार दि.२८ नोव्हेंबर रोजी या शाळेतील एक शिक्षक कामानिमित्त गैरहजर राहिले.त्याच दिवशी उपस्थित राहिलेल्या बोरकुटे नामक तळीराम शिक्षकानी चांगलाच कारणामा केला.शाळेत येण्यापूर्वीच त्यांनी दारू ढोसली.

एवढ्यावरच न थांबता शाळावेळात दुपारनंतर सुद्धा त्यांनी पुन्हा उतारी मारली.यावेळी मात्र आपल्याला दारू जास्त झाल्याचे समजताच विद्यार्थ्यांना खेळात मग्न ठेऊन शिक्षकांनी शाळेशेजारी असलेल्या शेतात धाव घेतली.दरम्यान त्यांनी शेतीतील एका बांधावर माथा ठेवला.यातच ते गाढ झोपी गेले.अखेर बऱ्याच वेळापासून बाहेर गेलेल्या शिक्षकाचा विद्यार्थ्यांनी शोधाशोध सुरू केला.या दरम्यान गावातीलच एका व्यक्तीला हे महाशय शेतीच्या बांधावर पडून असल्याचे दिसून आले.ही बाब वाऱ्यासारखी गावात पसरताच शाळेतील विद्यार्थी,शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी आणि  गावकऱ्यांनी गुरुजींच्या दिशेने धाव घेतली.मात्र एकत्र जमलेल्या गर्दीच्या कल्लोळानंतरही मद्यपी शिक्षक काही उठेना.अखेर शाळा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी हे प्रकरण गोंडपिपरी पोलिसांना फोनवरून सांगितले.
लागलीच पोलिस विभागाचे कर्मचारी भंगारपेठ गावात दाखल झाले.पोलिसांच्या माध्यमातून त्या तळीराम शिक्षकाला झोपेतून जागविण्यात आले.यानंतर त्या शिक्षकाला वैद्यकीय चाचणीसाठी गोंडपिपरी ग्रामीण रुग्णालयात आणले गेले.स्थानिक शाळा समितीच्या तक्रारीनंतर या गंभीर घटनेची नोंद गोंडपिपरी पोलिसांनी घेतली असतांना मागील चार दिवसापासून तर आजपर्यंत त्या शिक्षकावर कुठल्याच प्रकारची कार्यवाही झाल्याचे दिसून आले नाही.अशातच याकडे शिक्षण विभागाचे सुद्धा दुर्लक्ष होत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.या शिक्षकाची दारू पिऊन शाळेत येण्याची ही पहिलीच वेळ नसून यापूर्वी देखिल बऱ्याचदा ते मद्यधुंद स्थितीत शाळापरिसरात दिसून आले.यातच या शिक्षकाला भंगारपेठ गावात तब्बल १५ वर्ष झाले असतांना शिक्षण विभाग त्याच्यावर मेहेरबान कसे ? हा प्रश्न गावकऱ्यांमध्ये निर्माण होत आहे.