चिमुकल्या रेहानने रुग्णांना फळवाटप करून केला साजरा आपला वाढदिवस राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचा सहभाग - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चिमुकल्या रेहानने रुग्णांना फळवाटप करून केला साजरा आपला वाढदिवस राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचा सहभाग

Share This

खबरकट्टा / चंद्रपूर : चिमूर-प्रतिनिधी (जावेद पठाण)


       
रेहान रहेमान शेख या विद्यार्थ्यांच्या वाढदिवस निमित्य रुग्ण व मूकबधिर विद्यार्थ्यांना फळ वाटप करण्यात आले .प्रसिद्ध युवा व्यापारी रहेमान शेख यांचा मुलगा रेहान शेख हा सेंट कल्यारेंट विद्यालयाचा चौथी  चा विद्यार्थी असून त्याच्या मनात रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा कल्पना समजून तो दरवर्षी आपला वाढदिवस रुग्णांना फळवाटप करीत असतो. या वर्षी सुद्धा वाढदिवस उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळवाटप केले या फळवाटप कार्यक्रमास राष्ट्रीय मानवाधिकार एव सामाजिक संघटन शाखा चिमूर चे सहकार्य लाभले.
     
यावेळी राष्ट्रीय मानवाधिकार एव सामाजिक संघटन शाखा तालुका  चिमूर उपाध्यक्ष  प्रशांत डवले ,सचिव रुपेश जांभूळकर सहसचिव अब्दुल रहमान शेख कोषाध्यक्ष नितेश सिडाम तालुका संघटन मंत्री  प्रेमदास वासनिक शहर संघटन मंत्री गणेश संगेल अमित मेश्राम लिना उरकुडे यशोदा गायकवाड हेमलता जांभुळकर वंदना गेडाम रोहिणी गेडाम छाया सहारे वनिता सोरदे  रवींद्र टापरे आदी उपस्थित होते