नगराध्यक्षांची भ्रष्टाचार निवारण समितीच्या जिल्हाध्यक्षाना धमकी - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

नगराध्यक्षांची भ्रष्टाचार निवारण समितीच्या जिल्हाध्यक्षाना धमकी

Share This
खबरकट्टा / गडचिरोली : 

कुरखेडा नगरपंचायतचे नगराध्यक्ष गोटेफोडे यांनी धानोरा येथील भ्रष्टाचार निवारण समितीचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र आनंद देवीकार यांना दूरध्वनीद्वारे धमकी दिल्याने जिल्ह्यात खळबळ माजली आहे. 

आज दिनांक २१ डिसेंबर २०१९ रोजी दुपारी १.२४ वाजता कुरखेडा नगरपंचायतचे नगराध्यक्ष गोटेफोडे यांनी देवेंद्र देवीकार यांना दूरध्वनीद्वारे धमकी दिली आहे. याबाबत देवेंद्र देवीकार यांनी पोलीस अधीक्षक गडचिरोली यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. 


मोबाईलवर बोलताना नगराध्यक्ष गोटेफोडे म्हणाले की, तुम्ही कुठून बोलत आहात असे विचारले. 

आजपर्यंत कोणीही गडचिरोली, वडसा, आरमोरी व कोरची या तालुक्यातून आमच्याकडे टेंडरमध्ये आला नाही, तुम्ही पहिल्यांदा आले. तुम्हाला माझ्या वॉर्डामध्येच काम करायचे आहे आणि तुम्हाला येथे टेंडर टाकायला कोणी सांगितले. ५३ वर्षापासून मी इंजिनियर आहे. आयुष्यात दुसऱ्या कुठल्याही कामात गेलेलो नसून याच कामात गेलो आहे. तुम्हाला मंजुरी कोण देईल. या आणि मला भेटा, कधी ना कधी तुम्ही मला भेटणार आहात. जर तुमचे काम झाले तर मग मी तुम्हाला सांगेन. तुमच्या आवाजात जोर दिसतो ना तो कळेल. तुम्हाला पाहून घेऊ, अशा शब्दात धमकी दिल्याचे देविकार यांनी तक्रारीत म्हटले आहे. 


माझ्या कामात विनाकारण अडथळे आल्यास किंवा माझ्या जीवाला काही कमी-जास्त झाल्यास त्याला सर्वस्वी जबाबदार कुरखेडा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष गोटेफोडे राहतील, असेही देवेंद्र आनंद देविकार यांनी पोलीस अधीक्षक गडचिरोली यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले असून नगराध्यक्ष गोटेफोडे यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही केली आहे.