जिल्ह्यात अनेक बोगस आश्रमशाळांचा सुळसुळाट : समाजकल्याण सह आयुक्तांचा आशीर्वाद तर विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात : बनावट पटसंख्या दाखवून लाटतात लाखोंचे अनुदान - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जिल्ह्यात अनेक बोगस आश्रमशाळांचा सुळसुळाट : समाजकल्याण सह आयुक्तांचा आशीर्वाद तर विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात : बनावट पटसंख्या दाखवून लाटतात लाखोंचे अनुदान

Share This
-कोडशी (बु.) येथील आश्रम शाळेचा गैरप्रकार चव्हाट्यावर.

खबरकट्टा / चंद्रपूर :विमुक्त जाती , भटक्या जाती , इमाव व विमाप्र समाज कल्याण मंत्रालया मार्फत चंद्रपूर जिल्ह्यात २५ ते २६ आश्रम शाळा सुरू अाहे यापैकी अनेक आश्रम शाळा कागदोपत्रीच असून बोगस विद्यार्थी हजेरी पटावर दाखवून शासनाकडून करोडो रुपयांचे अनुदान संस्थाचालक व समाज कल्याणचे अधिकारी संगनमत करून लाटत आहे असा खळबळजनक आरोप तक्रारकर्त्याने केला असून कोरपना तालुक्यातील नदीकाठावरील कोळशी (बु.) येथील स्व.चमनसेठ प्राथ. आश्रमशाळेत सुरु असलेला गैरप्रकार उघडकीस आणत जिल्हाधिकारी यांचेकडे केलेल्या तक्रारीत सर्व आश्रम शाळांची पडताळणी करून कठोर कारवाईची मागणी केली आहे. 


कोरपना तालुक्यात कोडशी ( बु.) येथे स्व. चमनसेठ प्राथ.आश्रम शाळेत १ ते ७ पर्यंत वर्ग भरतात हजेरी पटावर ७१ निवासी विद्यार्थी दर्शवितात मात्र आश्रम शाळेत फक्त ७ विद्यार्थि उपस्थित असतात शाळेत कुठल्याही सोयी सुविधा नसून विद्यार्थ्यांना अत्यंत निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात असून या ठिकाणी उपस्थित असलेल्या सातही विद्यार्थ्यांचे जीवन असुरक्षित दिसते वसतिगृह अधीक्षक संस्थाचालकाचा नातेवाईक असल्याने घरी बसूनच पगार लाटतात अशी माहिती आहे.

समाजकल्याण विभागाद्वारे प्रत्येक महिन्याला आश्रमशाळेला भेट देवून तपासणी केली पाहिजे असा नियम आहे असे असतांनाही अधिकारी मात्र कार्यालयात बसूनच तपासणी करीत असल्याने समाजकल्याण विभागाच्या आशीर्वादानेच जिल्ह्यात अशा अनेक बोगस आश्रम शाळांचा सुळसुळाट असून  अधिकारी व संस्थाचालकाचे संगनमताने शासनाचे करोडो रुपयांचे अनुदान लाटले जाते.
सन २०१८-१९ मध्ये महाराष्ट्रातील सर्व आश्रम शाळांची पडताळणी जिल्हाधिकार्‍यांनी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश शासनाने दिले होते चंद्रपूर जिल्ह्यात अनेक बोगस आश्रमशाळा असल्याने या शाळांना वाचविण्यासाठी एका  मंत्रीमहोदयाच्या राजकीय दडपणाने जिल्हाधिकार्‍यांनी जिल्ह्यातील आश्रमशाळांची पडताळणी केली नाही जिल्ह्यातील बोगस आश्रमशाळेपासुन मिळणारी माया व मंत्री महोदयांचे निकटवर्ती असल्याने समाजकल्याणचे सह आयुक्त चंद्रपूर जिल्ह्याची खुर्ची सोडण्यास इच्छुक नसल्याची धक्कादायक माहीती आहे सहआयुक्तांची बदली काही महीन्या पूर्वी वर्धा येथे झाली होती.

परंतु राजकीय वजन वापरुन चंद्रपूर सोडले नाही आश्रमशाळांना समाजकल्याण विभागाचा आशीर्वाद असुन संगनमताने अनुदान लाटण्याचा प्रकार सुरू असल्याने जिल्हाधिकारी यांनी तात्काळ जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळांची पडताळणी करून कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.


कोळशी येथील आश्रमशाळेत बोगस विद्यार्थी दाखवून मागील वर्षी अनुदान लाटल्याची गुप्त माहिती होती याबाबत खात्री करण्याकरिता शाळेला भेट दिली असता शाळेत ७ विद्यार्थी अंत्यत निकृष्ट दर्जाचे जेवन करीत होते अधिकक्ष , मुख्याध्यापक हजर नव्हते ए.आर.शेख व व्ही.बी. गायकवाड शाळेत हजर होते त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली व त्यांचे नोकरीचा प्रश्न आहे असे सांगितले शाळेत कुठल्याही सोयी सुविधा नाही आश्रम शाळेतील हजर सातही विद्यार्थांना जेवण करताना त्यांचे ताटातील भात व निव्वळ तेल तिखट टाकलेली बरोबर न शिजलेली दाळ बघितल्यावर चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ खेळला जातो असे वाटले अशा बोगस आश्रम शाळा चालविणार्‍या संस्थाचालकांसह शाळेचे मुख्याध्यापक , अधीक्षक , शिक्षक व समाजकल्याण विभागाच्या अधिकार्‍यांना दंडीत करुन त्यांचेवर शासनाने कठोर कारवाई केली पाहीजे. अभय मुणोत,  सदस्य ग्रामपंचायत नांदा