(१० डिसेंबर) महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या तुमसर आगार मधील चालक संजय वैद्य, यांनी मानसिक ताणतणाव होत असल्यामुळे आज दुपारी बारा वाजता च्या दरम्यान किटनाशक विष पिऊन आत्महत्या करण्याचे प्रयत्न केले.
त्यांना भंडारा येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. व त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे. सदर या घटनेमुळे कर्मचाऱ्यांनी एकजूट दाखवत बस्थानक परिसरात संपूर्ण बसेस उभे करून अन्याय झालेल्या चालक कर्मचारी संजय वैद्य याचा बाजूने उभे राहून समर्थन दर्शविले.
परिणामी या घटनेमुळे प्रवासी व विद्यार्थ्यांचे मोठे हाल झाले. या गंभीर घटनेची दखल घेत परिवहन महामंडळाचे अधिकारी श्री नागुलकर हे भंडाऱ्याहुन तुमसर आगार स्थळी आले. आणि या घटनेची माहिती घेऊन याप्रकरणी आगर व्यवस्थापक किंवा इतर अधिकारी दोषी असल्यास त्यांच्यावर निश्चितच कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री संतोष बिसेन व त्यांचे पोलीस कर्मचारी उपस्थित होते. या आश्वासनानंतर चालक व वाहक कर्मचाऱ्यांनी सायंकाळी आगर मधून बस सेवा सुरू केली.