राजुरा परिसरात वाघांची वाढती दहशत : गोवरी शेतशिवार व नाल्यातही आढळले वाघाच्या पायांचे ठसे; नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

राजुरा परिसरात वाघांची वाढती दहशत : गोवरी शेतशिवार व नाल्यातही आढळले वाघाच्या पायांचे ठसे; नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :राजुरा - 

राजुरा लगत परिसरात वाघाची दहशत मागील काही महिन्यांपासून सुरु असून दररोज कुठे ना कुठे वाघाच्या हल्ल्याच्या घटना घडत असून सतत होत असलेल्या हल्यामुळे शेतकरी, मजूर, कामगार व रस्त्यावरुन ये- जा करणाऱ्या नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


आज सकाळी राजुरा शहरापासून आठ किमी अंतरावर असलेल्या गोवरी शेतशिवारातील रामदास पाचभाई यांच्या शेतात आणि गावातील नाल्यात वाघाच्या पायांचे ठसे आढळल्याने व आजच राजुरा शहरातील इंदिरा नगर वस्तीलागात कोडापे नामक व्यक्तीवर हल्ला केल्याने राजुरा परिसरात वाघांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचे नागरीकांमध्ये बोलले जात आहे. 
गेल्या महिन्याभरात मूर्ती येथे शेतात काम करीत असताना साळवे नामकशेतकरी व जोगपूर जंगलाच्या बाजूला चिचबोडी गावालगत दोन वेळा गुराख्यांवर हल्ला चढविला असून, चिचबोडी विरूर स्टेशन व शिर्शी गावानजीक काही लोकांना व्याघ्र दर्शन झाले आहे. तर दोन चार दिवसांपूर्वी चुनाळा येथील गाय वर हल्ला केला तर तीन दिवसांपूर्वी बोडगाव येथील जर्शी गाय मारल्या गेली यामुळे या जंगलातील वाघांची संख्या जास्त असून याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
वनविभागानेही परिसरातील वाघांची भ्रमंती लक्षात घेता अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या जोगपूर-हनुमान मंदिर यात्रा बंद ठेवली होती तरीही दैनंदिन शेतीची कामे करणे आवश्यक असताना वाघांच्या हमल्यात वाढ झाल्याने सर्वत्र भीतीचे वातवरण आहे.