खबरकट्टा / चंद्रपूर :
मिलाप बहुउददेशीय सेवा संस्था चंद्रपूर द्वारे अशोक सम्राट हायसकूल चिचपल्ली मध्ये सिकसेल सप्ताह व जागतिक एच.आय. व्हि. एड्स पंधरवडा निमित्याने हायस्कूल मधील विद्यार्थी व विद्यार्थिनी ला सिकलसेल व एच.आय. व्हि. एड्स बदल माहिती देण्यात आली.
सिकसेल आजार कसा होतो, त्याची लक्षणे काय आहे, त्याचे उपचारा विषयी रोशन आकुलवार यांच्या द्वारे मार्गदर्शन केले तसेच सिकसेल बाबत भीती न बाळगता सिकसेल बाबत माहिती घेऊन आपण नागरिकांना सिकसेल बदल जागृत करा तसेच नागरिकांच्या मनात असणाऱ्या गैरसमज व अफवांबदल त्यांच्या मनातील गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमामध्ये अशोक सम्राट हायसकूलचे शिक्षकवर्ग व विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच संस्थेतर्फे विशाल जोगी, रोशन आकुलवार, अनिल उईके, पवन कांत उपस्थित होते.