खबरकट्टा /चंद्रपूर चिमूर - प्रतिनिधी ( जावेद पठाण )
खडसंगी येथे विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त खडसंगी येथील बहुजन विचार बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने अभिवादनास्पर सामाजिक उपक्रम म्हणून मागील चार वर्षांपासून गरजू विद्यार्थ्यांना वही व पेनाचे वाटप करण्यात येते.
६३ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त स्थानिक जि. प.उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वही व पेनाचे वाटप करून महामानवास अभिवादन करण्यात आले. या वेळी मंचाकावर प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समितीचे गटनेते अजहर शेख उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात महामानवाच्या प्रतिमेस अभिवादन करून करण्यात आली.
या प्रसंगी उपस्थित अजहर शेख यांनी महामानवाच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकीत विदयार्थ्यांना मार्गदर्शन केलं. विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते वही व पेनाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे संचालन सहायक शिक्षक बाम्बोडे यांनी केले.या प्रसंगी संस्थेचे सचिव प्रशांत मेश्राम,प्रतिक औतकर,राहुल धारने, मयूर मेश्राम,प्रतीक चिंचाळकर,रोशन खोंडे, धीरज शंभरकर,प्रफुल गेडाम,गौरव पाटील,पियुष गेडाम व सौरभ कावळे उपस्थित होते.