खबरकट्टा / चंद्रपूर :
गोंडवाना विद्यापीठाने उन्हाळी परीक्षा 2020 पासून परीक्षा शुल्क 10% व नंतर प्रत्येक परीक्षेला 5% वाढ करण्याचा निर्णय विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेने घेतला. यावर्षी अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आणि विद्यापीठाने शिक्षण शुल्क माफ केले.
परंतु नुकताच जाहीर केलेला परीक्षा शुल्क वाढीचा निर्णय हा जुलमी स्वरूपाचा आहे. आणि गोरगरीब विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा त्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तीव्र निषेध करते. विद्यापीठाने या निर्णयाचा फेरविचार करावा व निर्णय मागे घ्यावा अन्यथा विद्यापीठाला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या आंदोलनाला सामोरे जावे असा इशारा दिला. यासंबंधीचे निवेदन अभाविप गडचिरोली शाखेने कुलगुरू श्री. कल्याणकर सर याना दिले.