चोरांच्या अफेवरून युवकांना बेदम मारहाण : एकाच घटनास्थळीच मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी : पत्ता विचारण्यासाठी अनोळखी घराचे दार ठोठावणे जीवावर बेतले - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चोरांच्या अफेवरून युवकांना बेदम मारहाण : एकाच घटनास्थळीच मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी : पत्ता विचारण्यासाठी अनोळखी घराचे दार ठोठावणे जीवावर बेतले

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 


काल दिनांक 19 डिसेंम्बरला रात्रीचे 8.30 ते 9 दरम्यान तुकूम परिसरातील रहिवाशी युवक  अविनाश काल्लो व पंकज लांडगे,  अष्टभुजा -पागलबाबा परिसरात  एका मित्राचं घर शोधत असताना, घराचा पत्ता विचारण्यासाठी एका घरचे दार ठोठाविल्याने चोर असल्याच्या संशयावरून परिसरातील लोकांनी बेदम मारहाण केल्याने पंकज लांडगे याचा मृत्यू झाल्याची घटना काल रात्री घडली. 


गेल्या काही दिवसांपासून परिसरात चोरीच्या लहानमोठ्या घटनांवरून दार ठोठावून चोर आत शिरत असल्याची चर्चा आहे. तरीही अद्याप अशी कोणतीही घटना उघडकीस आली नसून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये अश्या सूचना पोलीस प्रशासनातर्फे आधीच जारी करण्यात आल्या होत्या. पंकज लांडगे व अविनाश कल्लो असे या दोन मित्रांचे नाव, पागलबाबा परिसरात मित्राचं घर शोधण्यासाठी त्यांनी एका घरी विचारणा केली तर त्या घरी एक महिला दोघांना बघताच आरडाओरडा करू लागली व आपल्या परिसरात चोर आले म्हणून नागरिकांना बोलवू लागली, अचानक घडलेल्या या घटनेने दोन्ही युवक घाबरले व ते पळायला लागले, परिसरातील काही नागरिक लाठ्या काठ्या घेऊन त्या युवकांच्या मागे होती.

दोन्ही युवकांचा पाठलाग करून त्यांना पकडण्यात आले व त्या परिसरातील एका झाडाला दोघांना बांधले व बेदम मारहाण सुरू केली, युवक वारंवार नागरिकांना विनवण्या करू लागले आम्ही चोर नाही, मित्राचं घर शोधण्यासाठी आलो परंतु नागरिकांनी त्यांचं काही न ऐकता त्यांना मारहाण सुरू ठेवली या मारहाणीत पंकज लांडगे या युवकाचा मृत्यू झाला.पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी अष्टभुजा परिसर गाठत युवकांना बाहेर काढले परंतु तोपर्यंत पंकज चा मृत्यू झाला व अविनाश हा गंभीर जखमी झाला निव्वळ  मित्राच्या घरचा पत्ता विचारता विचारता त्याला तेथील नागरिकांनी पंकज ला बेदम मारहाण केली.  या प्रकरणात रामनगर पोलिसांनी काही  आरोपींना अटक केली आहे, घटनेनंतर खुद्द जिल्हा पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी घटनास्थळी जाऊन पूर्ण माहिती घेतली असून अधिक तपास सुरु आहे.