वृद्ध इसमाचा तहसील कार्यालयात मृत्यू : श्रावणबाळ वृध्दापकाळ योजनेच्या मानधन अचानक बंद झाल्याची चौकशी करण्यास गेला होता कार्यालयात. - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

वृद्ध इसमाचा तहसील कार्यालयात मृत्यू : श्रावणबाळ वृध्दापकाळ योजनेच्या मानधन अचानक बंद झाल्याची चौकशी करण्यास गेला होता कार्यालयात.

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : पोंभुर्णा -वृध्दापकाळातील श्रावणबाळ वृध्दापकाळ योजनेद्वारे मिळणाऱ्या मानधनाबाबत चौकशी करायला गेलेल्या वृद्धाचा तहसील कार्यालयातच मृत्यु झाल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली. परशुराम विठ्ठल गेडाम वय (67)असे मृत पावलेल्या ईसमाचे नाव असुन तो पोंभूर्णा तालुक्यातील घोसरी येथील रहिवासी आहे. 

शासनाच्या वतीने वृद्ध नागरीकांसाठी श्रावणबाळ वृध्दापकाळ योजना व इत्तर काही योजना राबवल्या जातात. मृत परशुराम गेडाम यांना त्यांचे वृध्दापकाळ योजनेद्वारे मीळणारे मानधन बंद झाल्याची माहिती मीळाली. ते नेहमी तहसील कार्यालयाच्या चकरा मारत होते. आज ही ते याच संदर्भाने चौकशी करण्यासाठी तहसील कार्यालयात आले,आणि आपला जीव गमावून बसले. संबंधित टेबलाच्या जवळ गेल्यानंतर अचानक त्यांना चक्कर येऊन ते खाली कोसळले. तहसील कार्यालयाच्या गाडीनेच त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. हृदय विकाराच्या तिव्र झटक्याने त्यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज बांधण्यात येत असला तरी त्यांचा मृत्यू नेमका कशाने झाला हे अजून स्पष्ट नाही. 
घटनेच्या वेळेस मी कार्यालयातच उपस्थित होतो. माझ्याच शासकीय गाडीने त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले. तिथे त्यांचा मृत्यू झाला.मृत्यू हृदय विकाराच्या तिव्र झटक्याने झाला असावा असा अंदाज आहे. मृत्यू नैसर्गिक असल्याने त्यांच्या कुटूंबियांना तातडीची शासकीय मदत किंवा योजनेचा लाभ देता येणार नाही-डॉ. निलेश खटके, तहसीलदार, पोंभुर्णा.