अनुत्तरीत !: कवियत्री सौ. स्वप्ना पावडे यांची स्त्री-वंदन कविता..... - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

अनुत्तरीत !: कवियत्री सौ. स्वप्ना पावडे यांची स्त्री-वंदन कविता.....

Share This
खबरकट्टा : साहित्य-


अनुत्तरीत !

प्रत्येक ज्वाला
तुझीच गं भासते 
स्वप्न नासते....

अंध स्पंदने
ह्रदयेही बधीर
स्तब्ध रूधीर....

शांत डोहही
 माजली खळबळ
ती हळहळ......

क्रूरता मत्त
नरपशू माजले
क्रौर्य लाजले.......

वांझ वात्सल्य
ममताही कां दीन?
संस्कार हीन.....

प्रश्न नाचती
माझ्या भोवताली
कां मी स्त्री झाली?.....

✍🏻
स्वप्ना पावडे,वणी,जि-यवतमाळ