पहेल मल्टीपर्पज सोसायटी कार्यालय पडोली येथे पंचायत राज प्रशिक्षण - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

पहेल मल्टीपर्पज सोसायटी कार्यालय पडोली येथे पंचायत राज प्रशिक्षण

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर :

      
धारिवाल लिमिटेड व पहेल मल्टीपर्पज सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमानाने पहेल मल्टीपर्पज सोसायटी कार्यालय येथे एकदिवसीय पंचायत राज प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.यामध्ये कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संकल्प बहुउद्देशीय संस्थेचे (चंद्रपूर) संस्थापक श्री.संदीप सुखदेवे सर उपस्थित होते.तसेच  संस्थेचे सहाय्यक व्यवस्थापक श्री.धीरज ताटेवार सर,श्री.संदीप उरकुडे (प्रकल्प समन्वयक ),श्री.अनुराग मत्ते (प्रकल्प समन्वयक ) आणि तसेच शेणगाव,पांढरकवडा,मोरवा,धानोरा येथील स्वयंसहाय्यता बचत गटाच्या महिला,सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होत्या.

                        
या प्रशिक्षणामध्ये मुख्य म्हणजे पंचायत राज संकल्पना नेमकी काय, महिला आरक्षण, ग्रामपंचायत भूमिका, सरपंच व सदस्यांची भूमिका, महिला सभा,  ग्रामसभा, विकेंद्रीकरण नियोजन, ६३वी घटनादुरुस्ती, महिलांचे कार्यक्रम व फंड तसेच केंद्रशासन,राज्यशासन व जिल्हा पातळीवरच्या योजना यावर चर्चा करण्यात आली.
              
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कु.शीतल नागपुरे व कु.मधुलिका पाटील यांनी सहकार्य केले.कार्यक्रमाचे संचालन कु.मधुलिका पाटील यांनी केले तर,आभार प्रदर्शन सौ.रंजना डवरे यांनी केले.