चंद्रपुरातील अट्टल दारू विक्रेत्या फरार महिलेस अटक करण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश : धाडीत सापडला लाखोंची बनावटी विदेशी दारू ! - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपुरातील अट्टल दारू विक्रेत्या फरार महिलेस अटक करण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश : धाडीत सापडला लाखोंची बनावटी विदेशी दारू !

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : शहर प्रतिनिधी -



चंद्रपूर शहरात दारू मोठ्या प्रमाणांत विकल्या जात असली तरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे बनावट दारू विक्रेत्यांची गोची झाली आहे. शहर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या महाकाली कॉलरी परिसरात बनावट दारू विक्रीच्या प्रकरणात पोलिसांच्या हातात तुरी देवून फरार झालेली आरोपी पायल बादल खंजर ही महिला बिनधास्तपणे पुन्हा अवैध दारू विक्री करीत असल्याची खबर स्थानिक गुन्हे शाखेला लागली होती. 

यात पुन्हा स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी मोठ्या शिताफीने सापळा रचून फरार आरोपी पायल बादल खंजर ,महाकाली कॉलरी वार्ड,चंद्रपुर हीचेविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा क. 65 ई. सह क. 465 भादवि अन्वये गुन्हा नोंद करण्यांत आला आहे. 

पोलीस हवालदार सुरेश गोमाजी केमेकर  ब.नं. 1533 वय 56 वर्ष, स्थानिक गुन्हे शाखा, यांच्या फिर्यादीवरून सदर गुन्हा नोंद करण्यांत आला असून सदर माहिती त्यांना गुप्त बातमीदाराकडुन खात्रीलायक बातमी बातमी कि पायल बादल खंजर ,महाकाली कलरी वार्ड,चंद्रपुर हीचे राहते घरामध्ये बनावट विदेशी दारुचा साठा आहे. 

सदर बातमीच्या अनुषंगाने राकेश बाबाराव पवार वय 27 वर्ष रा. तुकुम चद्रपुर व राजकुमार गोपाल नंदवशी वय 40 रा. बालाजी वार्ड, चंद्रपुर यांना पंच म्हणून बोलावुन सत्यता पडताळणीसाठी सुचनापत्र देवुन सोबत येण्यास केळविले. पंच  येण्यास तयार झाल्याने पोलीस नियंत्रण कक्ष स्टेडा नोंद क्र.28/19 वेळ 20.05 वाजता नुसार पोलिसांनी सोबत वरील पंच व पोलिस चमूतील उपनिरिक्षक विकास मुंढे, सहायक फोजदार पंडित वाटे/778,  अनुप डांग/680, नितीन/2549, भारती/ 82 व चालक यांनी सदर महिलेच्या घरी धाड टाकून तिच्याकडून मोठ्या प्रमाणांत दारूचा साठा पकडला आणि तिला अटक केली.