खबरकट्टा / चंद्रपूर : समाजसेवा हीच ईश्वरसेवा हेच ब्रीद वाक्य घेऊन महामानवाला वंदन करून आज दि.6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिना चा औचित्य साधून व रक्तदूत मंगेशभाऊ पाचभाई यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा नेत्रातपासनी शिबीर आणि शस्त्रक्रिया शिबीरा चे आयोजन करून महापरिनिर्वाण दिन दत्त मंदिर येथे युवा समाजसेवा च्या सर्व सदस्यगण यांनी मिळून संपन्न केला.
या शिबिरामध्ये झरी जामनी तालुक्यातील विभिन्न परिसरातून रुग्ण (महिला -पुरुष) आले ,अडेगाव ,मुकुटंबन, खातेर, आमलोन ,आणि लहान मोठ्या सर्व गावमधून जनसामान्य जनता या शिबिरामध्ये सहभागी होऊन आपले नेत्र तपासून घेतले आहे. या शिबिराला समता फाऊंडेशन मुबंई यांच्या माध्यमातून आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी(मेघे) याचे सहकार्य लाभले. जवळपास शिबिरामध्ये 336 महिला पुरुषांनि आपले नेत्र तपासून घेतले व 9 डिसेंबर सोमवारला सर्व रुग्णांना मोफत शस्त्रक्रिया साठी पाठवल्या जाईल.
रुग्णालयाचे कर्मचारी डॉ.वंदना पंजवाने, डॉ.आकांक्षा बेले, डॉ.निकुश धांडे, मुरलीधर उमाट े(वैद्यकीय समाजकार्यकर्ते) ,गंगाधर तडस(वैद्यकीय समाजकार्यकर्ते), सुरेश चरडे(वैद्यकीय समाजकार्यकर्ते) आदींचा योगदान आणि या शिबिराला गावातील जेस्ट मंडळी जनार्धन मोहितकर,सुरेश वराटे ,तुकाराम पा.सूर ,बबन पारखी ,सुधाकर लालसरे ,वाघूजीगुरुजी उरकुडे, धनंजय पाचभाई, उत्तम पाचभाई ,दादाजी चिंने ,नामदेव वनकर, नरेंद्र काटकर, (डुडलू) याचे मोलाचे योगदान या शिबिराला लाभले.
यावेळी युवा समाजसेवा ग्रुप चे विजय लालसरे, संतोष पारखी ,गणेश पेटकर, विलास देठे ,राहुल ठाकूर, प्रणल गोंडे, महेंद्र पाल,खुशाल पारखी, विकास पारखी,राकेश किंनेकर, रवीद्र चिंचुलकर, विजय भोयर, देवानंद पाचभाई, दत्ता लालसरे ,दिनेश गेडाम ,सुरज पेटकर, दिनेश जीवतोडे,सुरज डहाके ,संदीप झाड े,सुरज मशिरकर ,योगेश बेलेकर, गणेश बुरडकर ,गिरीधर राऊत ,गजानन हुलके, शंकर पत्रकार, दिगंबर पाचभाई ,प्रदीप पेटकर व समस्त गावकाऱ्याच्या उपस्थित शिबिर संपन्न झाले.