खबरकट्टा / दिनविशेष : (22 डिसेंबर 2019)
"गणिताचे कोडं...!"
गणितातील समीकरणे सोडवतांना
लक्ष्यात ठेवावी लागतात खूप सूत्र
पण एका सूत्रामुळे गणित चुकते
कारण ह्याच जग आहे थोडं विचित्र..!
बेरीज,वजाबाकी करतांना पोरांना
हातचे पण घ्यायचे असते
गणित शिकवणाऱ्या शिक्षकांना
विद्यार्थी वर्गात दिसत नसते..!
गुणाकार,भागाकार करण्यासाठी
पाठांतर करावी लागतात पाढे
गणित चूकल्यास शिक्षक पोरांना
छडीतुन देतात हातावर पेढे..!
गणितातील कंस सोडवितांना
विद्यार्थ्यांची होणार कधी सुटका
ह्या गणिताच्या एका कंसामुळेच
काही विद्यार्थाना येतो हृदय झटका..!
क्षेत्रफळ,सरासरीच्या वेळी असतात
आयात,चौकोन आणि वर्तुळ(गोल)
तेव्हा खऱ्या अर्थाने कळू लागते
गणिताचा अभ्यास असतो किती खोल..!
गणिताचे कोडं ज्यांना सोडवता येतं
त्याची प्रगती नक्की होणार अगणित
पण भीतीमुळे पळ काढणाऱ्यांचे
चुकनार नक्कीच भविष्याचे गणित...!
✍🏻
सुरज पी. दहागावकर.
चंद्रपूर
ब्रेकींग : भांगडिया भाजपा सोडण्याच्या तयारीत ? : अजित पवारांच्या गुप्त भेटीने राजकीय चर्चांना उधाण !