खबरकट्टा / चंद्रपूर : चिमूर - प्रतिनिधी ( जावेद पठाण )
चिमूर येथील नगर परिषदेला ४ वर्षे पूर्ण झाली असून चिमूर शहराच्या माध्यभागी उमा नदीला लागून बघावे तिकडे घाणीचे साम्राज्य नगर परिषद चिमूर द्वारे करण्यात आले आहे.
या संदर्भात जनतेनी अनेक तोंडी व लेखी तक्रारी केल्या असून कचरा डम्पिंग साठी जागा खरेदी करण्यात आली आहे परंतु अजूनही शहराच्या मध्यभागीच शहरातील केर कचरा गोळा करून त्याची साठवणूक उमा नदी पात्रालगत करीत असल्यामुळे आणि चिमूर वासीय जनतेला उमा नदीचे पाणी प्यावे लागत असल्याने जनतेचे आरोग्य धोक्यात येत आहे.
याकडे नगर सेवक - नगर सेविका यांचे व मुख्याधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे जर हे असेच नियमित सुरू राहिले तर यामुळे मलेरिया, कावीळ, टायफाईत सारखे असंख्य आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढ होण्यास काहीही वेळ लागणार यामुळे स्थानिक चिंतेत आहेत.