चिमूर नगर परिषदेचे स्वच्छ भारत मिशन अभियान या मोहिमेकडे दुर्लक्ष - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चिमूर नगर परिषदेचे स्वच्छ भारत मिशन अभियान या मोहिमेकडे दुर्लक्ष

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :चिमूर - प्रतिनिधी ( जावेद पठाण )

चिमूर येथील नगर परिषदेला ४ वर्षे पूर्ण झाली असून शहराच्या माध्यभागी उमा नदीला लागून बघावे तिकडे घाणीचे साम्राज्य नगर परिषद  द्वारे करण्यात आले आहे. 

या संदर्भात जनतेनी अनेक तोंडी व लेखी तक्रारी केल्या असून कचरा डम्पिंग साठी जागा खरेदी करण्यात आली असूनही , अजूनही शहराच्या मध्यभागी शहरातील केर कचरा गोळा करून त्याची साठवणूक उमा नदी पत्रालगत करीत असल्याने जनतेचे आरोग्य धोक्यात येत आहे.


याकडे नगर सेवक - नगर सेविका यांचे व मुख्याधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे जर हे असेच नियमित सुरू राहिले तर यामुळे रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होण्यास काहीही वेळ  लागणार नाही.