"चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून ब्रम्हपुरी जिल्हा घोषित करावा" व नव्याने स्थापित चिमूर उपजिल्हा कार्यालय निर्माण करून ब्रम्हपुरी चा समावेश केला या निर्णयाला जनतेचा विरोध असून ब्रम्हपुरीकरांना पूर्वत जिल्ह्यात समावेश करावा.या मागणीचे निवेदन शिवसेना शाखा ब्रम्हपुरी च्या वतीने मान.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे महाराष्ट्र शासन यांना उपविभागीय अधिकारी ब्रम्हपुरी यांच्या मार्फत तहसीलदार श्री सयाम यांना देण्यात आले.
ब्रम्हपुरी विद्येचे माहेर घर असून शिक्षण सोडल्यास संपूर्ण शिक्षणाची सोय असून चंद्रपूर, गडचीलोली,भंडारा, गोंदिया तसेच नागपूर पासून विद्यार्थी शिक्षणासाठी येतात.तसेच सामाजिक सांस्कृतिक क्रीडा वैद्यकीय क्षेत्रात नावारूपास आलेला आहे. नगरपरिषद, ब्रिटिश कालीन बत्तीस दरवाजांची तहसील कार्यालय मोठ्या प्रमाणात शासकीय जमीन रेल्वे व इतर दळणवळणाच्या सयुक्त मोठी व्यापारपेठ असून लगत आरमोरी वडसा हे तालुके सुद्धा आहेत.
जिल्ह्याची मागणी ही फार जुनी असून याआधी राजकीय डावपेचाचा बळी म्हणून ब्रह्म उघडून गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. व ब्रह्मपुरी करा वर अन्याय झाला. या सरकारने जनतेच्या जनतेच्या भावनेचा आदर करून चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून ब्रानपुर जिल्ह्याची निर्मिती करावी व कोणत्याही प्रकारचा दळणवळणाची सोय नसलेल्या चिमुर उपजिल्हा कार्यालयात ब्रह्मपुरी ला जोडले ते वगळून ब्रह्मपुरी करांना पूर्ववत प्रशासकीय कार्यालय जोडावा.
या मागणीचे निवेदन शिवसेना शाखाप्रमुख च्या वतीने देण्यात आले निवेदन देताना प्रा. शाम करंबे मनीष श्रीवास्तव ,नरू नरड ,श्यामराव भानारकर, सेलोकर, संदेश साहरे व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.