चिमूर व खडसंगी वनपरिक्षेत्रात जीपीएस प्रणालीच्या वापरातून अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर जप्त - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चिमूर व खडसंगी वनपरिक्षेत्रात जीपीएस प्रणालीच्या वापरातून अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर जप्त

Share This
-वनविकास महामंडळाच्या विशेष पथकाची धडक कारवाही
खबरकट्टा / चंद्रपूर : चिमूर- प्रतिनिधी  ( जावेद पठाण )

चिमूर परिसरातील  खडसंगी वनपरिक्षेत्रात अवैधरित्या रेतीची वाहतुक करुन तस्करी करणाऱया वाहनांवर वनविकासच्या विशेष पथकाने कारवाई सुरु केली आहे. वन परिमंडळ अधिकारी आणि वन विकास महामंडळाच्या विशेष पथकाचे प्रतिनिधी श्री. रमेश बलैया यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाही केली असून या कारवाहीत रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर जप्त केले आहेत. 


चिमूर व खडसंगी वनपरिक्षेत्रात अवैधरित्या रेतीची वाहतुक करुन तस्करी होत असल्याची माहिती वनविकास महामंडळाच्या विशेष पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाचे प्रमुख रमेश बलैय्या व त्यांचे पथकातील सहकारी कारवाही नियोजित करून  सोमवारी दि. २३ रोजी पहाटे चार वाजता वनविकास महामंडळाच्या विशेष पथकाने  भीसी क्षेत्रात जाऊन रेती वाहतुक करणारऱ्या वाहनावर जप्तीची कारवाई करून ट्रॅक्टर मालक प्रकाश सिताराम रेवतकर रा. भीसी याला अटक केली. 

रेती तस्करी करणारे ट्रॅक्टरवर जीपीएस प्रणालीचा वापर करून ट्रॅक्टर मालक आपल्या ट्रॅक्टर चे लोकेशन ट्रॅक्टर चालकला देत असतात ट्रॅक्टर रेती तस्करीला वनक्षेत्रात गेल्यापासून तो परत भिसी गावात येईपर्यंत ट्रॅक्टर मालकाला त्याच्या मोबाईलवर ट्रॅक्टरचे जीपीएस लोकेशन मिळत असतात तसेच ट्रॅक्टर मालक वनक्षेत्राच्या जवळपास थांबून ट्रॅक्टर चालकाला वनक्षेत्राच्या बाहेर येण्याकरीता वनाधिकाऱ्यांची हालचालीची माहिती देत असतात अशाप्रकारे जीपीएस प्रणालीचा वापर अवैध रेती तस्करी करणारे करत असल्याचे आज निदर्शनात आले असे पथक प्रमुख रमेश बलैया यांनी सांगितले.


वनक्षेत्रात अवैध रेती वाहतूक करणाऱ्या तस्करावर प्रतिबंध आणण्याकरीता विशेष मोहीम सुरू असून त्यांनी आत्ता पर्यंत जवळ पास अनेक वेळा कारवाही करून अवैध रेती वाहतुक तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरवर जप्तीची कारवाई केली. पथकात क्षेत्र सहाय्यक  अशिष बायस्कर, वनरक्षक आर.पी.आगोसे व इतर वनाधिकाऱ्यांचा समावेश आहे. या कामासाठी पश्‍चिम चांदा वन प्रकल्प विभागाचे विभागीय वनाधिकारी मा. विवेक मोरे  व सहाय्यक व्यवस्थापक सुनील आत्राम तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी ऋतुराज बारटक्के यांच्या मार्गदर्शन मिळाले.