भंगारपेठमधील मुख्याध्यापकाच्या बेजबाबदार वर्तनाबाबत माहिती मिळाल्यानंतर संवर्ग विकास अधिकान्यांकडून तत्काळ अहवाल मागविण्यात आला होता. त्यानंतर गुरुवारी त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून, काही दिवसातच दारूड्या मुख्याध्यापकाविरोधात विभागीय चौकशी सुरू केली जाणार आहे.-राहल कर्डिले.मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. चंद्रपूर
खबरकट्टा / चंद्रपूर : गोंडपिपरी -
गोंडपिपरी तालुक्यातील सीमावर्त भागात असलेल्या भंगारपेठ येथील एक मुख्याध्यापकाने दारू ढोसून बांधावरच दिवस काढला होता. दारूच्या नशेत असलेल्या या मुख्याध्यापकाला जागविण्यासाठी पोलिसांना पाचारण करण्याची वेळ गावकऱ्यांवर आली होती.
चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी नंतरही गोंडपिपरी तालुक्यासह इतर भागात मुबलक दारू मिळत आहे.तेलंगणा राज्यातून भंगाराम तळोधी परिसरात दारूच पुरवठा होत असल्याने हा भाग अवैध दारूसाठी प्रसिद्ध आहे. बंदीतही सहजरित्या दारू उपलक होत असल्याने भंगाराम तळोधीलगतच्या भंगारपेठ गावातील जि.प.शाळेतील मुख्याध्यापक अनिल बोरकुटे याने दिवसभर दारू ढोसून विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याचे काम मागील आठवड्यात गुरुवारी केले होते. शाळेत येण्याऐवजी दारूच्या नशेत अख्खा दिवस बांधावर घालविला.
टच करा बातमी वाचा : मद्यधुंद"ड्युटी"--बघा विडिओ : तळीराम शिक्षक शाळा वेळात शेताच्या बांधावर करतो "ड्युटी"! - मद्यधुंद अवस्थेत झोपा काढत घालवितो दिवस
टच करा बातमी वाचा : मद्यधुंद"ड्युटी"--बघा विडिओ : तळीराम शिक्षक शाळा वेळात शेताच्या बांधावर करतो "ड्युटी"! - मद्यधुंद अवस्थेत झोपा काढत घालवितो दिवस
१५ वर्षांपासून हा शिक्षक त्या ठिकाणी कार्यरत असून, पाच वर्षांपूर्वीसुद्धा त्याच्यावर अशाच दारू प्रकरणात पोलीस कारवाई झाली होती. शिक्षण विभाग व शाळा समितीनेही त्याला बऱ्याचदा संधी दिली. मात्र, कुठलाच बदल होताना नसून, शाळेच्या वेळेत दारू ढोसून कर्तव्य पार पाडण्याचा त्याचा नियमित प्रकार सुरू राहिला.
मागील आठवड्यात गुरुवारी सकाळी १० वाजता दारू ढोसून शाळेत आला. दुपारी पुन्हा दीड वाजता दारू पिल्याने त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे स्वतःसह विद्यार्थ्यांना देखील त्याने खेळपट्टीवर उतरवले. मात्र, त्याला तोल सांभाळत नसल्याने लगतच्या शेताच्या बांधावरच तो कोसळला होता.
टच करा बातमी वाचा : गोंडपिपरीत पुन्हा एक व्यापारी सापडला अवैध धंद्यात : पोलिसांनी पकडलेल्या "दारू तस्करीत" -निलेश बानोले चालकासहित माल सोडून फरार !
टच करा बातमी वाचा : गोंडपिपरीत पुन्हा एक व्यापारी सापडला अवैध धंद्यात : पोलिसांनी पकडलेल्या "दारू तस्करीत" -निलेश बानोले चालकासहित माल सोडून फरार !