खबरकट्टा / चंद्रपूर :चिमूर - प्रतिनिधी ( जावेद पठाण )
चिमूर तहसिल मध्ये विना चाकाची ट्रॅक्टर जप्त करण्यात आल्याची चर्चा सध्या चिमूर शहरात सर्वत्र सुरू असून तहसिलदारांवर काळिमा फासणारी हि बाब आहे.
तलाठी अवैधरीत्या रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर पकडून तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात वाहन जप्त करून ठेवत असून तहसिल कार्यालयातून ट्रॅक्टर ची चाके चोरीला गेली असावी अशी मते दर्शवित आहे. महसूल विभाग झोपी गेला असा यावरुन स्पष्ट होतांना दिसत आहे.
एकदा शासकीय जप्तीत जमा केलेल्या सामानाची पूर्ण जबाबदारी संबंधित कार्यालयाची असते. जर जप्त ट्रॅक्टर ची चाके चोरीला गेली असेल तर गोर - गरीब जनतेच्या दस्तावेजाचं काय ? याकडे तहसीलदार व उप विभागीय अधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज आहे.