नेरी येथे एड्स व सिकलसेल जनजागृती रॅली - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

नेरी येथे एड्स व सिकलसेल जनजागृती रॅली

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :चिमूर - प्रतिनिधी ( जावेद पठाण )

नेरी येथे जागतिक एड्स दिना निमित्त एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्र उपजिल्हा रुग्णालय चिमूर तसेच जनता विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय नेरी यांच्या संयुक्त विद्यमाने एड्स व सिकलसेल जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 


जीवघेण्या असा एड्स हा आजार आहे  व सिकलसेल या आजारापासून मुक्ती मिळावी तसेच गावागावात जनजागृती होऊन लोकांना या आजाराची लक्षणे, घ्यावयाची काळजी व  उपाय यांची माहिती मिळावी या करिता नेरी शहरातील प्रमुख मार्गातून रॅली चे आयोजन करण्यात आले.


या कार्यक्रमात उपजिल्हा रुग्णालय चिमूर, जनता विद्यालय नेरी, राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय चिमूरचे राष्ट्रीय सेवा योजना व रेड रिबन क्लब, संकल्प बहू. ग्राम विकास संस्था चंद्रपूर, सर्वोदय युवा विकास संस्था चिमूर, इ. चा सहभाग होता. प्रमुख उपस्थितीत उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. जि. डब्लू. भगत, प्राचार्य एस. एन. येरणे, कामिनी हलमारे समुपदेशक उ. जिल्हा रुग्णालय, सुमेध साखरे प्रयोगशाळा तंत्रज्ञ,लिंक वर्कर ज्योती पोपटे, माधव बांडेबूचे, वाघमारे सर, वर्धलवार, एम.एम. पिसे, एस. पी. पंधरे, पडोळे होते. या मध्ये जनता विद्यालय नेरी व आर. टी. एम. महाविद्यालय चिमूर च्या विद्यार्थ्यांनीनी सहभाग घेतला होता.