जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने सास्ती ग्रामपंचायतच्या दोन सदस्यांचे सदस्यत्व रद्द - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने सास्ती ग्रामपंचायतच्या दोन सदस्यांचे सदस्यत्व रद्द

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा- 

राजुरा तालुक्यातील औद्योगीक क्षेत्रातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या सास्ती ग्रामपंचायतीच्या दोन सदस्यांनी मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने चंद्रपूरचे जिल्हाधिकारी डाँ. कुणाल खेमनार यांनी आदेश पारित करुन अखेर या दोन्ही सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले आहे. 


हे दोन्ही सदस्य भारतीय जनता पक्षाचे सदस्य असून त्यामुळे सास्ती ग्रामपंचायतीतील भाजपचे संख्याबळ कमी होऊन आता ही संख्या तिन वर आली आहे. दोन वर्षापूर्वी सास्ती ग्रामपंचायतीची निवडणूक झाली. 

या निवडणूकीत नागरिकाच्या मागास प्रवर्ग ( महिला ) या क्षेत्रातून नंदा शरद चेतूलवार आणि अनुसूचित जातीसाठी राखीव क्षेत्रातून कृष्ण अवतार बानय्या संबोजी हे दोघे निवडून आले. निवडून आल्यावर या दोघांनाही राखीव जागेवर निवडून आल्याने जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याचे निर्देश मा.जिल्हाधिकारी,चंद्रपूर यांनी दिले. परंतू अनेक सुनावणीत संधी देऊनही हे दोन्ही सदस्य जात वैधता प्रमाणपत्र सादर करु शकले नाही. 


अखेर मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील तरतूदीनुसार आणि मा. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निवाड्यानुसार जात व्हँलिडीटी प्रमाणपत्र सादर न केल्याने अखेर भुतलक्षी प्रभावाने या दोन्ही सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा आदेश चंद्रपूर जिल्हाधिकारी यांनी दिला आहे. 


सास्ती ग्रामपंचायतीत गेल्या २० वर्षापासुन शिवसेनेची सत्ता आहे. गेल्यावेळी शिवसेनेचे सरपंचासह सात, भाजपचे तिन व काँग्रेसचे दोन सदस्य निवडून आले होते. मात्र काँग्रेसच्या दोन्ही सदस्यांनी भाजपात प्रवेश केल्याने भाजपचे संख्याबळ पाच झाले होते. परंतू आता पुन्हा ही संख्या तिन वर आली आहे.