विदर्भ राज्य आंदोलन समितीचे २४ डिसेंबरला जिल्हयातील तालुकास्थळी आत्मक्लेश आंदोलन - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

विदर्भ राज्य आंदोलन समितीचे २४ डिसेंबरला जिल्हयातील तालुकास्थळी आत्मक्लेश आंदोलन

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :


स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मान करण्याच्या मागणीसाठी आंदोलन समितीने " विदर्भ मिशन " या नावाने चार टप्प्यात आंदोलनाची दिशा ठरविली आहे. याची सुरुवात २ डिसेंबरला सेवाग्राम येथे एक दिवसाचे सामुहिक उपोषण करुन झाली असून आता २४ डिसेंबरला विदर्भातील सर्व जिल्हा व तालुकास्थळावर एक दिवशीय आत्मक्लेश आंदोलन करण्यात येणार आहे. 


या आंदोलनात नागरीक, युवक, महिला व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन चंद्रपूर जिल्हा विदर्भ राज्य आंदोलन समितीने केले आहे. गेल्या तिस वर्षापासुनची भाजप- सेना युती तुटल्याने आता विदर्भ निर्मितीसाठी भाजपाने पूर्वी घेत असलेल्या भूमिका बदलून आपल्या पूर्वीच्या स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मीतीचे वचन पुर्ण करावे, अशी आंदोलन समितीची मागणी आहे. 

विजेचे वाढते अन्यायकारक दर, पावसामुळे उध्वस्त झालेली शेती, शेतक-यांची संपुर्ण कर्ज व विज बिल मुक्ती, ग्रामीण भागातील विजेचे लोडशेडींग यासह विदर्भातील अनेक ज्वलंत प्रश्नांसाठी हे आत्मक्लेश आंदोलन करुन सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती समितीचे नेते अँड. वामनराव चटप यांनी दिली. 

चंद्रपूर जिल्हयातील जिल्हा व सर्व तालुकास्थळावर हे आंदोलन होणार असुन या आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार अँड. वामनराव चटप, किशोर पोतनवार, प्रभाकर दिवे, अरुण पाटील नवले, विलास धांडे, प्रविण गुंडावार, मितीन भागवत, प्राचार्य अनिल ठाकुरवार, कपील इद्दे, अरुण वासलवार, अँड. प्रफुल्ल आस्वले, श्रीराम काळे, तुकेश वानोडे, राजेश कवठे, मोहन सातपुते,कवडू पोटे, प्रभाकर ढवस, रमेश नळे, बंडू राजुरकर यांचेसह विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अनेक पदाधिकारी करणार आहेत.