खबरकट्टा / महाराष्ट्र : थोडक्यात -
कर्जमाफीसाठी आधार कार्ड बँक खात्याला लिंक करावं लागणार :
राज्यातील ठाकरे सरकारने शेतकऱ्यांसाठी आज मोठा निर्णय घेतला. शेतकऱ्यांची दोन लाख रूपयांपर्यंतची कर्जमाफी होणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना ना कोणता ऑनलाईन फॉर्म भरावा लागणार. ना पत्नीला सोबत घेऊन रांगेत उभं राहावं लागणार. शेतकऱ्यांना केवळ आपलं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करावं लागणार आहे. एवढी एकच अट शेतकऱ्यांसाठी असेल, असं राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी सांगितलं.
नव्या कर्जमाफीसाठी कोण पात्र?
♦राज्यातील छोटे- मोठे सर्व शेतकरी या कर्जमाफीसाठी पात्र आहेत.
♦ ज्या शेतकऱ्यांनी 30 सप्टेंबर 2019 पर्यंत कर्ज घेतलं आहे, ते सर्व शेतकरी पात्र
♦ ज्या शेतकऱ्यांनी पीककर्ज म्हणून कर्ज घेतलं आहे, त्यांचं कर्ज माफ होईल.
♦ ज्या शेतकऱ्यांचं कर्ज दोन लाखापेक्षा जास्त असेल, त्यांचं दोन लाखापर्यंतचं कर्ज माफ होईल.
♦शेतकऱ्यांना कोणत्याही अटींशिवाय कर्जमाफी मिळेल.