वाघ बछड्याच्या हमल्यात गुराखी जखमी : परिसरात वाघाची वाढती दहशत ! - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

वाघ बछड्याच्या हमल्यात गुराखी जखमी : परिसरात वाघाची वाढती दहशत !

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा -

राजुरा तालुक्यातील चिचबोडी गावालगत शेतशिवारात वाघाच्या बछड्याने गुराख्यावर हमला केल्याची घटना घडली असून, बछड्याला गुराख्याने  हुसकावून लावले असून त्याच्या पायावर बछड्याच्या नखांचे गंभीर घाव पडले. 







आज दिनांक 12डिसेंबर दुपारी 12:30 च्या सुमारास देविदास चंद्रू तलांडे (42) चिचबोडी शेतशिवारात आपली बैल चरण्यास फिरत असताना अचानक अंदाजे वाघाच्या एक वर्षीय बछड्याने त्यांच्यावर हमला करून पायावर गंभीर जखम दिली.तलांडे यांनी बछड्यावर काठीने प्रतिहल्ला करताच तो पळून गेला. नंतर तलांडे यांनी आरडाओरड केल्याने बाजूच्या शेतातील शेतकरी धावत येऊन त्याला तात्काळ गावात आणून ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. 




गेल्या पंधरवड्यातील चिचबोडी शेतशिवारात व्याघ्र हमल्याची ही दुसरी घटना असून परिसरात 4 प्रौढ वाघ फिरत असल्याचे वनविभागाच्या कॅमेऱ्यात ट्रॅप झाल्याने तहसीलदार व वनविभागा तर्फे सूचना जारी करण्यात आल्या होत्या. लगतच्या जोगापूर देवस्थान मंदिर परिसरात सुद्धा यावर्षी भाविकांना जत्रा बंदी करण्यात आली असून रात्री च्या वेळेस प्रवाश्याना दक्ष राहणे आवश्यक आहे.