खबरकट्टा / चंद्रपूर : बल्लारपूर -
बल्लारपूर शहरातील पेपर मिल च्या मुख्य प्रवेश द्वाराजवळील कला मंदिर बस स्थानक चौक समोरील मार्गावर दुचाकी चालकास एस टी बस ने समोरून धडक दिल्याने चालकाचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक 15 डिसेंबर 2019 ला सायंकाळी 5 च्या सुमारास घडली.
वर्दळीचे ठिकाण असलेल्या पेपर मिल मुख्य प्रवेशद्वारासमोरील मार्गावरून दुचाकीस्वार दुचाकी क्रमांक एमएच 34 बिके 0071 हा वळण घेत असताना अचानक चंद्रपूर च्या दिशेने जाणाऱ्या भरधाव एस टी बस ने धडक दिली व न थांबता निघून गेली. जबर धडक झाल्यावरही चालकाने थांबून चौकशी करण्याचे औदार्य दाखविले नसल्याचे प्रत्यदर्शीने सांगितले.
बल्लारपूर वाहतूक पोलिसांनी लगेच धाव घेत गर्दी व वाहतुकीवर नियंत्रण मिळविले असले तरीही वर्दळीच्या चौकात वाहतूक सिग्नल व नियंत्रणाचा प्रश्न उरतोच.