खबरकट्टा / यवतमाळ : वणी शहर प्रतिनिधी -
ट्रिपल सीट कार्यकर्त्यांना चालान केल्याच्या कारणावरून येथील भाजपचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी एका होमगार्ड जवानाला मारहाण केल्याचे सांगितले जाते. ही घटना मंगळवारी सायंकाळी ७ वाजता घडली.
दरम्यान हे प्रकरण वणी पोलीस ठाण्यात पोहोचले असून वृत्त लिहिस्तोवर कोणतीही कारवाई झालेली नव्हती. प्रकाश बालाजी बोढे नामक होमगार्ड जवान आपल्या काहीसहकाऱ्यांसह टिळक चौकात वाहतूक नियंत्रणाचे काम करीत असताना एका मोटारसायकलवर तिघेजण येत असताना दिसले.प्रकाश बोढे याने सदर दुचाकीलाअडवून चालान करण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिघापैकी एकाने गाडी चालान होत असल्याबाबतआ.बोदकुरवार यांना माहिती दिली.त्यामुळे आमदार लगेच तेथे पोहोचले.
होमगार्ड दुचाकीला चालान करीतअसल्याचे दिसताच ते वाहनाखाली उतरले. यावेळी चालान करणाराहोमगार्ड खाकी शर्टच्यावर आणखी पांढऱ्या रंगाचे शर्ट घालून होता.त्यामुळे आ.बोदकुरवार यांनी त्याचाहात पकडून वर्दीबाबत विचारणा केली. तसेच इतक्या मोठ्या रकमेचीचलान का फाडत आहे, असा सवालकरीत सदर होमगार्डच्या कानशिलातलगावली, अशी चर्चा आहे. या घटनेनंतर संबंधित होमगार्ड वणी वाहतूक शाखेत पोहोचला.
यासंदर्भात ठाणेदार वैभव जाधव यांना विचारणा केली असता याप्रकरणात अद्याप तक्रार झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.प्रकाश बोढे याला विचारणा केली असता, यासंदर्भात त्याने प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
मी टिळक चौकात पोहचलो तेव्हा संबंधित होमगार्ड सिव्हील ड्रेसमध्ये चलान फाडत होता. त्यामुळे त्याचा हात पकडून मी त्याला समज दिली.होम गाईच्या गणवेशात राहून ड्युटीकरा, असे बजावून सांगितले.- आ.संजीवरेड्डी बोदकुरवार