वणीत चिमुकलीवर अत्याचार : आरोपीस तात्काळ अटक. - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

वणीत चिमुकलीवर अत्याचार : आरोपीस तात्काळ अटक.

Share This
खबरकट्टा / यवतमाळ :


वणी तालुक्यातील गणेशपूर येथे लहान मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली व पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली आहे.


अशीच एक घटना शहरानजीक असलेल्या गणेशपुर येथे घडली आहे.छबन बापुराव आस्कर असे नराधमाचे नाव असुन आरोपिने आपल्या घराशेजारीलच एका पाच वर्षिय चिमुकल्या मुलीवर अत्याचार केला आहे.हि घटना दि.5 नोव्हेंबरला दुपारच्या सुमारास घडली अाहे. चिमुकली आपल्या अंगणात खेळत असतांना छबनने त्या मुलीला तंबाकाची पुडी आणन्याच्या बहाण्याने घरात बोलावले व त्या चिमुकलीवर अत्याचार केला.या घटनेची माहिती सदर मुलीने आपल्या आई वडीलांना दिली.

यानंतर पती पत्नीने मिळुन त्याला विचारना केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. घटनेला चार दिवस लोटुन गेले.काय करावे त्यांना कळत नव्हते. काही नातेवाईकांनी त्यांना धिर दिला व अत्याचार करणार्याला शिक्षा झालीच पाहीजे म्हणुन वणी पोलीसात येवुन रितसर तक्रार दाखल केली.या तक्रारी वरुन पोलीसांनी 376,ऐ बी 4,6 पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद करुन आरोपिला तात्काळ अटक केली.

सदरचि कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिलकुमार नायक,पोलीस निरीक्षक वैभव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि माया चाटसे यांनी केली.