धानोली येथे दिव्यांग विद्यार्थ्यांचा सत्कार जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

धानोली येथे दिव्यांग विद्यार्थ्यांचा सत्कार जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :कोरपना -


महाराष्ट्र ग्राम सामजिक परिवर्तन अभियान अंतर्गत धानोली ग्रामपंचायत समाविष्ट झाली तेव्हा पासून विविध कार्यक्रम घेऊन नागरिकांना मध्ये जनजागृती केली जात असते. याच धर्तीवर वर धानोली  जिल्हा परिषद शाळा व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाला  प्रमुख उपस्थिती म्हणून सरपंच विजय रणदिवे, ग्रामपरिवर्तक सुपदा वानखेडे, आरोग्य सेविका गावीत्रे ,आशा वर्कर प्रेमीला मडावी,अंगणवाडी सेविका सुनीता सूर, शिंदे उपस्थित होते.

जिल्हा परिषद शाळा धानोली येथील दोन दिव्यांग विद्यार्थी  प्रवीना सुरेश किनाके, सुजन चंद्रभान कोटनाके या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला सोबतच त्यांच्या वडिलांचा देखील सत्कार करण्यात आला. ग्रामपरिवर्तक यांनी दिव्यांग कडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन आणि त्याच्या मध्ये असणारे सुप्त गुण यांना चालना मिळण्यासाठी शिक्षक व वडिलांना आव्हान करण्यात आले.दिव्यांग मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करून जिद्दीने शिक्षण घेण्यासाठी चा एक प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत स्तरावरील दिव्यांग राखीव निधी योग्य प्रकारे त्यांच्यावर खर्च केल्या जात असल्याचे ग्रामपरिवर्तक यांनी सांगितले. दोन्ही विध्यार्थीना दिव्यांग  प्रमाणपत्र देखील काढून देण्यात आले आहे.

दिव्यांग व्यक्तींना जगदीश गणपत जाधव, सुंदरलाल दिपचंद पवार यांना अटल दिव्यांग योजनेतून इलेक्ट्रॉनिक सायकल देखील मिळून देण्यात आली. तसेच समाज कल्याण मार्फत उदरनिर्वाह साठी झेरॉक्स मशीन  व आर्थिक मदत सुद्धा करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन जि.प.शाळचे शिक्षक कुळमेथे यांनी केले तर  आभार जीवने  यांनी मानले यावेळी जि. प शाळेचे विद्यार्थी व गावकरी उपस्थित होते