लोकनेते स्मृतिशेष प्रभाकरराव मामुलकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान आणि मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे श्री शिवाजी महाविद्यालयात आयोजन - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

लोकनेते स्मृतिशेष प्रभाकरराव मामुलकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान आणि मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे श्री शिवाजी महाविद्यालयात आयोजन

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 


श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा येथील राष्ट्रीय सेवा योजना पथकाद्वारे लोकनेते स्मृतिशेष प्रभाकरराव मामुलकर यांच्या जयंतीनिमित्त श्री शिवाजी महाविद्यालयात भव्य रक्तदान आणि मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन आज दिनांक 19 डिसेंबर 2019 ला सकाळी 8.00 ते दुपारी 1.00 या वेळेत केलेले आहे.

तरी राजुरा परिसरातील युवकांनी या रक्तदान शिबिरात जास्तीतजास्त संख्येने उपस्थित राहून रक्तदान करावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वारकड तथा राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. गुरुदास बल्की यांनी केलेले आहे. 

या शिबिरात संग्रहित झालेले रक्त चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीला देण्यात देऊन त्यातून अनेक गरजूंना रक्ताचा पुरवठा करता येईल.


दरवर्षी 19 डिसेंबर ला मा. प्रभाकरराव मामुलकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून श्री शिवाजी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना पथक रक्तदान शिबिराचे आयोजन करीत असते. आणि या शिबिरास भरभरून प्रतिसाद सुद्धा मिळतो, हेच लक्षात घेऊन यावर्षी रक्तदान शिबिरासोबतच मोफत आरोग्य तपासणी सुद्धा करण्याचे ठरविले आहे.

यामध्ये रक्तदाब, डायबिटीस, रक्तगट, एड्स, हिमोग्लोबिन या आवश्यक तपासण्या या शिबिरात केल्या जाणार आहे.

रक्ताच्या कमतरतेमुळे अनेक गरजूं पेशंट ला वेळेवर रक्त मिळत नाही आणि त्यामुळे अनेकांना रक्त न मिळाल्यामुळे आपला जीव गमवावा लागतो, एकाही पेशंटचा रक्ताच्या कमतरतेमुळे जीव जाता कामा नये ही बाब लक्षात घेऊन  युवकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी व जास्तीत जास्त युवकांनी रक्तदान करावे यासाठी राष्ट्रीय सेवा योजना पथकाद्वारे रक्तदानासाठी युवकांमध्ये जनजागृती मागील काही वर्षांपासून करत आहे.