खबरकट्टा / चंद्रपूर -चिमुर - प्रतिनिधी ( जावेद पठाण )
दिनांक.१२/१२/२०१९ राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष मा. शरद पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त चिमूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे उप जिल्हा रुग्णालयात तसेच मूक बधिर विद्यालयात केक कापून वाढदिवसाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
त्या निमित्य मूक बधिर विध्यार्थीना आणि जिल्हा रुग्णालयातिल रुग्णाना फळ, बिस्किटे वाटप करण्यात आले. यावेळी शिक्षक व शिक्षिका तसेच डॉक्टर राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष सुरेश रामगुंडे , रमेश खेरे जिल्हा महा सचिव , योगेश ठुने तालुका अध्यक्ष , सुधाकर हनवते उप तालुका अध्यक्ष , मंगेश बारापत्रे उर्फ कचरा सेठ शहर अध्यक्ष , अजय चौधरी , देविदास धोटे , अशोक शंभरकर ,संदीप रामगुंडे व आदी यावेळी या कार्यक्रमाला उपस्थित होते.