"शिवरत्न सेने"ने चंद्रपूर जिल्ह्यातील स्थानिक भूमिपुत्रांच्या न्याय -हक्कासाठी रोवली मुहूर्तमेढ : प्रदीप उमरे (शिवरत्न सेना, संस्थापक / अध्यक्ष) जिल्ह्यात उभारणारलढा ! - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

"शिवरत्न सेने"ने चंद्रपूर जिल्ह्यातील स्थानिक भूमिपुत्रांच्या न्याय -हक्कासाठी रोवली मुहूर्तमेढ : प्रदीप उमरे (शिवरत्न सेना, संस्थापक / अध्यक्ष) जिल्ह्यात उभारणारलढा !

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर (प्रतिनिधी):- 
महाराष्ट्रातील राजकारण्यांनी घराणेशाहिन आणि चंद्रपूर जिल्ह्यातील प्रस्थापीत "सर्वपक्षीय पुढाऱ्यांनी " दळभद्री राजकारण लादून जिल्ह्यातील मराठी तरुणांचे सामर्थ्य हिरावून घेतले  आणि त्यांच्या हातात फक्त "सण-उत्सव" साजरे करण्यासाठी वर्गणी पावती पुस्तके दिली. 


दुर्देवाने शेकडो गाड्यांचा ताफा घेऊन फिरणारे राज्यकर्ते आमच्यावर  लादले गेलेले असले तरी, चंद्रपूर जिल्ह्यातील स्थानिक "भूमिपुत्रांसाठी व मराठी माणसांच्या न्यायहक्कांसाठी-तरुणांसाठी" एक वेगळा "विचार" आणि एक वेगळी "संघटना" घेऊन आपणचंद्रपूरमध्ये, जिल्ह्याचे आराध्य दैवत कुलस्वामिनी श्री महांकाली माते तसेच बोटावर मोजण्या इतके प्रामाणिक माणिक असलेले, राजकारणी आणि समाजकारणातसज्जन व सेवाव्रती असलेले आमचे मार्गदर्शक व सल्लागार  यांच्या तसेच "स्वाभिमानी आणि निष्ठावंत "कार्यकर्त्यांच्या "बळावर-हिंमतीवर " शिवरत्न सेनेच्या स्थापनेची मुहुर्तमेढ  बुधवार, दिनांक २७, नोव्हेंबर -२०१९ रोजी आम्ही रोवण्यात यशस्वी झालो. राजकारण हा धंदा बनला आहे. पद पैसा  आणि सत्ता आली की, रग्गड पैसा कमवायचा व त्याचा पैश्याचा वापरकरत  आपली सत्ता अबाधित ठेवायची, हा सध्याच्या राजकारणातील यशाचा गुरुमंत्र बनला आहे. म्हणून राजकारणात आणि समाजकरणातील अंतिम सत्याला भिडण्याची हिम्मत फक्त "शिवरत्न सेनेतच" आहे - श्री. प्रदिप उमरे, संस्थापक अध्यक्ष 

जिल्ह्यातील मराठी माणुम, मराठी भाषा मराठी स्थाभिमान, मराठी संस्कृती आणि सरतेशेवटी चंद्रपूर जिल्ह्याची अस्मिता हा "शिवरत्न सेनेचा "चा मुख्य गाभा आहे. शेतकरी. शेतमजूर, कामगार, पर्यावरण,  राजकारण,समाजकारण हा संगळ्या "मुलभुत प्राणि संपेदनशिल" विषयांचा लढा  लवकरच आम्ही जिल्यात उभारु चत्यासाठी सदेव सातत्यानं कटिबद्ध राहू !जिल्ह्यातील सर्व पक्षीय" विश्वासघातकी राजकारण्यांच्या राजकीय  वआर्थिक कोंडीत  सापडून लाचार झालेल्या सर्वसामान्य मराठी-माणसाला सन्मानानं आणि जागवून जगविण्यासाठी, बरबटलेल्या -कुढलेल्या अंधारमय समाज व्यवस्थे विरोधात लढा देण्यासाठी "मी" उभा आहे. 
कुणीतरी हे शिव धनुष्य  उचललंच पाहिजे,जनतेच्या भावनांना नाही. तर त्यांच्या समस्यांना हात घालून "मी" त्या सोडविणार आहे. "शिवरत्न सेना "सर्वसमावेशक, सर्वजाती धर्म सोबत घेऊन "राजकारण-समाजकारण करणार आहे. 
शिवरत्न सेनेच्या "कार्याची आणि न्यायाची " व्याप्ती चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकारणात वाढल्यानंतर "राज्य निवडणूक आयोग, मुंबई,
महाराष्ट्र" यथे राजकीय पक्ष म्हणून "शिवरत्न सेनेची रितसर  आणि अधिकृत नोंदणी करण्यात येईल अशी माहितीशिवरत्न सेनेचे संस्थापक / अध्यक्ष श्री. प्रदिप उमरे" यांनी दिली आहे.